BCCI | बीसीसीआयने दाखवला बाहेरचा रस्ता, हा खेळाडू टीम इंडियातून ‘आऊट’

टीम इंडिया एकाबाजूला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जोरदार तयारी करतेय. तर दुसऱ्या बाजूला एका खेळाडूचं भवितव्य धोक्यात आहे. कोण आहे तो खेळाडू?

BCCI | बीसीसीआयने दाखवला बाहेरचा रस्ता, हा खेळाडू टीम इंडियातून 'आऊट'
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 5:27 PM

मुंबई : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआय टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूकडे सातत्याने दुर्लक्ष कपत आहे. बीसीसीआयने या खेळाडूला ड्रॉप केल्याने त्याचं करिअर धोक्यात आलं आहे. येत्या दिवसांमध्ये या खेळाडूला टीम इंडियात पुन्हा संधी मिळाली नाही, तर नाईलाजाने या खेळाडूला निवृत्तीसारखा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आहे.

हर्षल पटेल खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला तो आयपीएलच्या 14 व्या मोसमातून. हर्षल आयपीएलच्या 14 व्या हंगामात मुंबई विरुद्ध हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली. तसेच त्याने त्याच हंगामात सर्वाधिक 32 विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर हर्षलला टीम इंडियात स्थान दिलं. मात्र ठराविक काळाने हर्षलला डच्चू देण्यात आला.

बीसीसीआयने श्रीलंका विरुद्धच्या 3 मॅचच्या टी 20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर केला. या संघात हर्षल पटेल याचा समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतही निवड समितीने हर्षलकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.

हे सुद्धा वाचा

निवड समितीने हर्षलला त्याला टीममध्ये संधी मिळू शकत नसल्याचे अप्रत्ययक्ष संकेत आपल्या निर्णयातून दिले. हर्षलने आतापर्यंत 25 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने 29 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडियातून आऊट

हर्षल काही सामन्यांमध्ये महागडा ठरला. त्याने खोऱ्याने धावा लुटवल्या. हर्षलचं वय आत्ताच 32 वर्ष आहे. त्यामुळे त्याच्याकडे फार कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे हर्षलला टीममध्ये लवकर संधी मिळाली नाही, तर त्याला नाईलाजाने निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागू शकतो.

टीम इंडियाकडे गोलंदाजांची खाण आहे. यामध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर आणि शिवम मावी यासरखे गोलंदाज आहेत. त्यामुळे हर्षलला संघात स्थान मिळवायचं असेल, तर त्याला स्वत:ला सिद्ध करावं लागेल.

दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.