Team India | भारताचा प्रतिभावान गोलंदाज दुखापतीमुळे या महत्वाच्या स्पर्धेतून आऊट : सूत्र

टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार बॉलरला दुखापतीमुळे मोठ्या स्पर्धेतही खेळता येणार आहे. तसेच त्याला या दुखापतीतून पूर्णपणे बरं होण्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

Team India | भारताचा प्रतिभावान गोलंदाज दुखापतीमुळे या महत्वाच्या स्पर्धेतून आऊट : सूत्र
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 2:32 AM

मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. या दुसऱ्या सामन्यासाठी जोरदार सरावही केला आहे. मात्र त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा स्टार गोलंदाजाला दुखापतीमुळे आयपीएल 2023 स्पर्धेला मुकावं लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासह आयपीएल फ्रँचायजीसाठी ही धक्कादायक बातमी आहे.

प्रसिध कृष्णा आयपीएलच्या 16 व्या मोसमाला मुकणार आहे.प्रसिधला सप्टेंबर 2022 मध्ये दुखापत झाली होती. तेव्हापासून प्रसिध टीम इंडियातून बाहेर आहे. या दुखापतीमुळे प्रसिधला अनेक मालिकांना मुकावं लागलं होतं.

प्रसिध काही तासांपूर्वी रुग्णालयात दाखल झाला. प्रसिद्धला स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे फार त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे प्रसिधवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्रसिधने स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली. प्रसिधने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. “अनेक सामन्यांना मुकावं लागणार असल्याने मी दु:खी आहे. लवकरच परतेन”, असं कॅप्शन प्रसिधने या फोटोला दिलं आहे. प्रसिधवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

हे सुद्धा वाचा

स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे काय?

साधारणपणे स्ट्रेस फ्रॅक्चर तेव्हा होतो जेव्हा एकाच जागेवरील हड्डीवर ताण येतो.

प्रसिध आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळतो. राजस्थानने प्रसिधसाठी 10 कोटी मोजून त्याला आपल्या ताफ्यात कायम ठेवलं आहे. प्रसिध आयपीएलच्या 16 व्या मोसमात दुखापतीतून सावरत कमबॅक करेल, अशी आशा होती. मात्र आता सूत्रांनुसार त्याला आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिधला या दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी 6-8 महिन्यांचा वेळ लागू शकतो.

प्रसिधची आकडेवारी

प्रसिधने आयपीएलमधील कामगिरीने निवड समितीवर आपली छाप सोडली. आयपीएलध्ये कोलकातासाठी खेळताना टीम इंडियात त्याची निवड करण्यात आली. प्रसिद्ध दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. प्रसिध अखेरचा सामना हा 2022 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध खेळला होता. तेव्हापासून प्रसिधला टीममध्ये कमबॅक करता आलेलं नाही.

प्रसिधने 14 वनडे सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये प्रसिधने 25 विकेट्स घेतल्या आहे. प्रसिधची 25 धावा देऊन 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तसेच प्रसिधने आयपीएलमध्ये 17 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, केएस भरत, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हँडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.