Gautam Gambhir : स्वत:चे दिवस विसरलास का? पान मसाल्यावर बोलून गौतम गंभीर स्वत: असा फसला

Gautam Gambhir : पान मसाल्याच्या जाहीरातीवरुन इतरांना ज्ञान देताना गौतम गंभीर स्वत:च अडकला आहे. त्यामुळे त्याला ट्रोल केलं जातय. स्वत: त्या दिवसात कुठलीही जाहीरात केली होती, हे गंभीर कसं विसरला?

Gautam Gambhir : स्वत:चे दिवस विसरलास का? पान मसाल्यावर बोलून  गौतम गंभीर स्वत: असा फसला
gautam gambhirImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 4:14 PM

नवी दिल्ली : काहीही बोलताना विचार करुन बोला, हे जे कोणी म्हटलय ते एकदम योग्य आहे. गौतम गंभीर नेमकी हीच गोष्ट विसरला. गौतम गंभीरने काही माजी क्रिकेटपटूंवर प्रश्न उपस्थित केले. पण तो स्वत: यामध्ये फसला आहे. गौतम गंभीरने पान मसाला प्रमोट करणाऱ्या दिग्गज क्रिकेटर्सवर निशाणा साधला होता. त्याने कुठल्या क्रिकेटरच नाव घेतलं नव्हतं. पण आता तो, आपल्याच स्वत:च फसला आहे.

गौतम गंभीर असा अडकलाय, की लोक त्याला ट्रोल करतायत. सोशल मीडियावर त्याची फिरकी सुद्धा घेतायत. गौतम गंभीर काय बोलला होता, ते जाणून घ्या.

‘हे खूप खराब आणि दु:खद’

“मी माझ्या जीवनात पान मसल्याची जाहीरात करण्याचा कधी विचार केला नाही. हे खूप खराब आणि दु:खद आहे. क्रिकेटर रोल मॉडेल असतात. अशावेळी पान मसल्याला प्रमोट करुन तुम्हाला काय सिद्ध करायत असतं?” न्यूज 18 वर गौतम गंभीर हे बोलत होता.

3 कोटींची ऑफर धुडकावली

गौतम गंभीरने हे वक्तव्य करताना कुठल्या क्रिकेटरच नाव घेतलं नाही. पण त्याने IPL दरम्यान सिल्वर कोटेड इलायचीची जाहीरात करणाऱ्या क्रिकेटपटूंवर निशाणा साधला. दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टनशिप सोडली, त्यावेळी 3 कोटींची ऑफर होती. पण मी ऑफर धुडकावली असं गंभीर म्हणाला.

विसरलास का?

गौतम गंभीर खूप मोठं बोलला. पण सोशल मीडियावर तो ट्रोल होतोय. गौतम गंभीरला त्या दिवसांची आठवण करुन दिली, जेव्हा तो रॉयल स्टॅगची जाहीरात करायचा. दुसऱ्यांना ज्ञान देतोस, स्वत:चे दिवस विसरलास का? असं एका नेटीझनने म्हटलं आहे. दुसऱ्याने रॉयस स्टॅग काय बनवतो? हे गौतम गंभीरला माहित नसावं, असं दुसऱ्या नेटीझनने म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.