AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Jadeja : जाडेजामुळे टीम इंडियाच्या एका प्लेयरच करिअर संपल! नाईलाजाने घ्यावी लागली निवृत्ती

Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाची गोलंदाजी खेळणं ऑस्ट्रेलियाला झेपत नाहीय. चालू सीरीजमध्ये सर्वाधिक 17 विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. फक्त बॉलनेच नाही, तर बॅटने सुद्धा तो कमालीचा खेळ दाखवतोय.

Ravindra Jadeja : जाडेजामुळे टीम इंडियाच्या एका प्लेयरच करिअर संपल! नाईलाजाने घ्यावी लागली निवृत्ती
रविंद्र जडेजानं नाथन लायनचं अखेर ऐकलं, 24 तासांसाठी का होईना ती मागणी केली पूर्णImage Credit source: PTI
| Updated on: Feb 24, 2023 | 11:29 AM
Share

Ravindra Jadeja : विद्यमान बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये रवींद्र जाडेजा जबरदस्त खेळ दाखवतोय. पहिल्या दोन कसोटी सामन्यात जाडेजा ऑस्ट्रेलियासाठी काळ ठरलाय. त्याने एका सेशनमध्येच ऑस्ट्रेलियाची वाट लावून टाकली. त्याची गोलंदाजी खेळणं ऑस्ट्रेलियाला झेपत नाहीय. चालू सीरीजमध्ये सर्वाधिक 17 विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. फक्त बॉलनेच नाही, तर बॅटने सुद्धा तो कमालीचा खेळ दाखवतोय. टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावतोय. इंदोरला होळकर स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यावेळी सुद्धा जाडेजा ऑस्ट्रेलियासाठी मोठा काळ ठरु शकतो. रवींद्र जाडेजाची जेव्हा भारतीय टीमममध्ये एंट्री झाली, त्यावेळी त्याने एका खेळाडूच करिअर संपवलं. टीम इंडियात कधीकाळी रविचंद्रन अश्विनसोबत प्रज्ञान ओझाची जोडी हिट समजली जायची. पण रवींद्र जाडेजा टीममध्ये आल्यानंतर सर्वकाही बदललं.

तो सचिनच्या करिअरमधील शेवटचा सामना होता

लेफ्टी स्पिनर प्रज्ञान ओझाला वयाच्या 33 व्या वर्षीच निवृत्तीची घोषणा करावी लागली. त्याचं सर्वात मोठं कारण होतं रवींद्र जाडेजा. प्रज्ञान ओझा 14 नोव्हेंबर 2013 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. हा सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीचा सामना होता. मुंबईत हा कसोटी सामना खेळला गेला. प्रज्ञानने दोन्ही इनिंगमध्ये 40 रन्सवर 5 विकेट आणि 49 रन्सवर 5 विकेट काढल्या. दोन्ही इनिंगमध्ये मिळून त्याने 89 धावा देऊन 10 विकेट घेतल्या.

पण, तो पर्यंत उशिर झालेला

त्यानंतर प्रज्ञान ओझाच्या Action वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. त्यामुळे नाईलाजाने त्याला टीम इंडियाच्या बाहेर करण्यात आलं. त्यानंतर प्रज्ञान ओझाने Action मध्ये सुधारणा करण्यासाठी बरीच मेहनत केली. आयसीसीकडून क्लीन चीटही मिळवली. पण तो पर्यंत तत्कालीन कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या गुडबुकमध्ये रवींद्र जाडेजाने आपलं स्थान पक्क केलं होतं. त्यामुळे ओझा पुन्हा टीम इंडियात दिसला नाही. कानपूरमधून टेस्ट करिअरची सुरुवात

2009 साली टी 20 वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेश विरुद्धच्या सामन्याने प्रज्ञान ओझाने आपल्या T20 इंटरनॅशनल करिअरची सुरुवात केली. या मॅचमध्ये त्याने 21 धावा देऊन 4 विकेट काढल्या. त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. मात्र, तरीही त्याचं T20 इंटरनॅशनलमधील करिअर 6 मॅच, 10 विकेटपर्यंत मर्यादीत राहीलं. कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने सुद्धा त्याच्या बॉलिंगवर पूर्ण विश्वास दाखवला नाही. ओझाने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कानपूर टेस्टपासून आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली. ओझाने 24 कसोटी सामन्यात 30.26 च्या सरासरीने एकूण 113 विकेट काढले. त्याने टेस्ट करिअरमध्ये 7 वेळा 5 विकेट आणि एकदा 10 विकेट घेतले. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने शानदार प्रदर्शन केलं. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने 5 टेस्ट मॅचमध्ये 31 विकेट काढले. ओझाने टीम इंडियासाठी 18 वनडे सामन्यात 21 विकेट काढले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.