Rishabh Pant | ऋषभ पंत अपघातानंतर कमबॅक करण्याबाबत काय बोलला?
ऋषभ पंत सध्या क्रिकेटपासून दूर आहे. पंतचा डिसेंबर महिन्यात कार अपघात झाला होता. या अपघातामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली होती.
मुंबई | टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याचा डिसेंबर 2022 मध्ये अपघात झाला. पंत या अपघातातून बचावल्यानंतर आता तो सावरत आहे. पंतने स्वत: आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली. मला आता खूप चांगलं वाटतंय, असं पंत म्हणाला. पंतचा 30 डिसेंबर रोजी सकाळी 6 च्या दरम्यान अपघात झाला. पंत या अपघातातून थोडक्यात बचावला. पंतचं नियंत्रण सुटल्याने कार दिल्ली-देहरादून महामार्गावरील दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर गाडीने पेट घेतला. त्याआधीच पंत कारमधून बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. हा अपघात हरिद्वार जिल्ह्यातील नरसनदरम्यान झाला होता.
पंतने आयएएनएसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. पंतने त्याच्या तब्येतीसासाठी ज्यांनी प्रार्थना केली, त्या सर्व हितचिंतकांचे आभार मानले. तसेच मी भविष्यातील आव्हानांसाठी तयारी असल्याचंही पंतने स्पष्ट केलं.
पंत काय म्हणाला?
“मी आता फार बरा आहे. तब्येतीसह मी चांगली प्रगती करतोय. देवाच्या कृपने आणि वैद्यकीय पथकाच्या मदतीने मी लवकरात लवकर बरा होईन”, असा आशावाद पंतने व्यक्त केला.
“माझ्या भोवताली सर्वच सकारात्मक आहे नकारात्मक हे सांगणं जर कठीणच आहे. मात्र यातून मला नवा दृष्टिकोन मिळाला आहे की तुम्ही जीवनाकडे कशाप्रकारे पाहता”, असंही पंतने सांगितलं.
क्रिकेटला मिस करतोय का?
सर्वत्र क्रिकेट सुरु आहे, तु क्रिकेटपासून दूर आहेस. त्यामुळे तु क्रिकेटला किती मिस करतोयस, असा प्रश्न पंतला विचारण्यात आला.
“मी क्रिकेटला किती मिस करतो हे सांगणं फार कठीण आहे. कारण माझं आयुष्यच हे क्रिकेटसाठीच आहे. मात्र मी सध्या लवकरात लवकर बरं होण्यावर लक्ष केंद्रीत करतोय. तसेच मी क्रिकेट खेळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करु शकत नाही”, असं म्हणत पंतने आपली क्रिकेटप्रती असलेली उत्सुकता दाखवून दिली.
पंतचा असा झाला अपघात
पंत दिल्लीवरुन रुडकीला आपल्या राहत्या घरी आईला सरप्राईज द्यायला जात होता. या दरम्यान दिल्ली-देहरादून हायवेवर गाडी डिव्हायडरला धडकली. त्यानंतर गाडीने पेट घेतला. मात्र त्याआधीच पंत गाडीबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातानंतर पंतवर देहरादूनमध्ये 6 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं.
त्यानंतर पंतला पुढील उपचारांसाठी मुंबईत शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतवर दिनशॉ पारदीवाला यांच्या निगरानीखाली उपचार करण्यात आले.