Team India | टीम इंडियाचा स्टार खेळाडू 2 दिवसांनी चढणार बोहल्यावर
टीम इंडियाचे अक्षर पटेल आणि ओपनर बॅट्समन केएल राहुल दोघे विवाहबद्ध झाले. त्यानंतर आता आणखी एक क्रिकेटर लग्नबेडीत अडकणार आहे.
मुंबई | टीम इंडिया एका बाजूला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचे खेळाडू एकामागोमाग एक लग्न करतायेत. काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा फिरकी ऑलराउंडर अक्षर पटेल आणि ओपनर बॅट्समन केएल राहुल दोघे विवाहबद्ध झाले. त्यानंतर आता आणखी एक क्रिकेटर लग्नबेडीत अडकणार आहे. विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत सप्तपदी घेतल्या. तर अक्षरने गर्लफ्रेंडचा लाईफ पार्टनर म्हणून स्वीकार केला. आता यानंतर टीम इंडियाचा शार्दुल ठाकूर लग्नाच्या तयारीत आहे. शार्दुल 2 दिवसांनी 27 फेब्रुवारीला एंगेजवरुन मॅरीड होणार आहे.
शार्दुल गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत लग्न करणार आहे. याआधी शार्दुल-मिताली यांचा साखरपुडा हा 29 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला होता. त्यानंतर टी 20 वर्ल्ड 2022 कपआधी हे दोघे गोव्यात लग्न करणार होते. मात्र काही कारणांमुळे गोव्यात लग्न होणं शक्य झालं नाही. तसेच लग्नही पुढं ढकलावं लागलं.
मात्र आता अखेर लग्नाला मुहुर्त सापडला आहे. शार्दुलच्या हळदीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हळदीच्या कार्यक्रमात शार्दुलने झिंगाट डान्स केला. शार्दुलच्या डान्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शार्दुल ठाकूर याचा झिंगाट डान्स
View this post on Instagram
शार्दुल मुंबईतच लग्न करणार असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, शार्दुलच्या लग्नाला 200 जण उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळतेय. त्यामुळे शार्दुल लग्नानंतर काही दिवसांनी रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
कोण आहे मिताली पारुलकर?
मिताली परुळकर ठाण्यात ऑल द बेक्स नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. शार्दुल मितालीला गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत होता. अखेर या अनेक वर्षांच्या पार्टनरशीपनंतर दोघेही लाईफ पार्टनर होणार आहेत.
दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. या कसोटी मालिकेनंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या वनडे सीरिजसाठी शार्दुल याची निवड करण्यात आली आहे.
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई
दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई
या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.