AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडर 19 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाची धडक, आता या संघाशी होणार सामना

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. सुपर सिक्सच्या शेवटच्या सामन्यात नेपाळला पराभूत करत आपलं स्थान पक्कं केलं आहे. आता टीम इंडियाचा सामना ग्रुप 2 मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल.

अंडर 19 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाची धडक, आता या संघाशी होणार सामना
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा दिमाखात प्रवेश, उपांत्य फेरीत हा संघ असेल समोर
| Updated on: Feb 02, 2024 | 9:51 PM
Share

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. एका पाठोपाठ एक अशा पाच संघांना पराभूत करत टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडनंतर भारताने नेपाळचा 100 हून अधिक धावांनी धुव्वा उडवला. सचिन धस आणि उदय सहारन यांच्या शतकी खेळीमुळे भारताने धावांचा डोंगर रचला होता. या खेळीच्या जोरावर भारताने नेपाळसमोर विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं होतं. नेपाळने सावध सुरुवात केली. पण त्यानंतर नेपाळचा डाव पत्त्यासारखा कोसळला. दीपक बोहरा आणि अर्जुन कुमाल बाद झाल्यानंतर रांगच लागली. एकेरी धावसंख्येवर एका पाठोपाठ एक खेळाडू तंबूत परतले. नेपाळला 50 षटकात 9 गडी गमवून फक्त 165 धावा करता आल्या. भारताने नेपाळचा 132 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारताने ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. आता ग्रुप 2 मधील दुसऱ्या स्थानी असलेल्या संघाशी उपांत्य फेरीत सामना होणार आहे. भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.

दुसरीकडे, ग्रुप 1 मधून पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठेल अशी स्थिती आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत पाकिस्तान ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने असतील. भारत पाकिस्तान या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीचा सामना जिंकला तर मात्र अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील.उपांत्य फेरीचा पहिला सामना 6 फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसरा सामना 8 फेब्रुवारीला होईल. तर अंतिम फेरीचा सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, सौम्य पांडे, आराध्य शुक्ला.

नेपाळ अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): अर्जुन कुमाल, दीपक बोहरा, उत्तम थापा मगर (विकेटकीपर), देव खनाल (कर्णधार), बिशाल बिक्रम केसी, दीपक डुमरे, गुलसन झा, दीपेश कंडेल, सुभाष भंडारी, आकाश चंद, दुर्गेश गुप्ता

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.