Team India | टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटरच्या घरात घुसून लूट, व्हीडिओ व्हायरल
टीम इंडियाचा स्टार खेळाडूच्या घरात लूट झाली आहे. स्वत: क्रिकेटरने या लुटीचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यांच्या दृष्टीने निर्णायक आहे. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू कसून सराव करत आहेत. एका बाजूला टीम इंडियाचे खेळाडू सराव करतायेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरच्या घरात घुसून लूट करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टीम इंडियाचा दीपक चाहर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दीपक सध्या ऋषिकेश इथे कुटुंबासोबत वेळ घालवतोय. इथेच सर्व हा लूटीचा प्रकार घडला.
नक्की काय झालं?
चाहरला लुटणारा चोरटा नसून माकड होता. दीपक एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्या हॉटेलच्या रुममध्ये माकड आला. माकडाने लूटायला सुरुवात केली. या माकडाने दीपकचा मोबाईल, पैसे नाही तर केळं चोरलं. दीपकने माकडासोबतच्या या मस्तीचा व्हीडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय.
व्हीडिओत नक्की काय?
दीपकने पोस्ट केलेल्या या व्हीडिओत माकड हा हॉटेलच्या गॅलरीत बसलाय. “आणखी खाणार का?”, अशा शब्दात दीपकने माकडाची प्रेमळ चौकशी केली. दीपकने माकडाला सफरचंद दिलं. त्यानंतर दीपक घरात आला. दीपकच्या मागे माकडही आला. माकडाने डाव साधत टेबलवर ठेवलेला केळा उचलला आणि फरार झाला.
“मी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र हा माझं सामानाची लूट केली. हे असं माझ्यासोबत नेहमीच होतं. #बजरंगबली”,अशी पोस्ट दीपकने केलीय.
दीपकची माकडासोबत मस्ती
View this post on Instagram
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होतेय. मालिकेतील पहिला सामना हा नागपुरात खेळवण्यात येणार आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.