Vinod Kambli Net Worth: विनोद कांबळीची दयनीय स्थिती, एकेकाळी कोट्यवधींची संपत्ती आणि आता अशी वेळ

Vinod Kambli Net Worth : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Vinod Kambli Net Worth: विनोद कांबळीची दयनीय स्थिती, एकेकाळी कोट्यवधींची संपत्ती आणि आता अशी वेळ
vinod kambli
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 6:08 PM

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी अवघ्या काही दिवसांपूर्वी महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणाच्या कार्यक्रमात भेटले. सचिन तेंडुलकरने अनेक दिग्गज खेळाडू घडवणाऱ्या महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं मुंबईतील दादरमधील शिवाजी महाराज पार्क येथे अनावरण केलं. त्यानंतर जाहीर कार्यक्रमाच्या मंचावर विनोद कांबळी आणि सचिनची भेट झाली. विनोद कांबळी मंचाच्या एका कोपऱ्यात बसलेला. सचिन कांबळीला पाहून त्याच्या दिशेने गेला. कांबळी सचिनला पाहून भावूक झाला. सचिननेही त्याची विचारपूस केली. कांबळीला सचिनला मिठी मारायची होती. मात्र कांबळी अवस्था इतका वाईट होती की त्याला निट उभंही राहा आलं नाही. तेव्हापासून सचिन आणि कांबळी या दोघांची तुलना करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

सचिन आणि विनोद या दोघांनी आचरेकर सरांच्या मार्गदर्शनात क्रिकेटची बाराखडी गिरवली. दोघांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला जवळपास काही महिन्यांच्या अंतरानेच सुरुवात झाली. दोघांनीही शिवाजी महाराज पार्क ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट अशी मजल मारली आणि ठसा उमटवला. डावखुरा कांबळी हा सचिनपेक्षाही सरस असल्याची चर्चा होती. मात्र कांबळीला स्टारडम टिकवता आलं नाही, असं आता त्याची स्थिती पाहून म्हटलं जात आहे.

कांबळीची तब्येत हा त्याचा सर्वात मोठा मायनस पॉइंट. कांबळीला नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात निट उभही राहता आलं नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा कांबळीच्या प्रकृतीचा मुद्दा समोर आला. नको त्या सवयी आणि हलगर्जीपणामुळे कांबळीची राजा ते रंक अशी घसरण झाली. कांबळीचं वय 52 वर्षांचा आहे मात्र तो 75 वर्षांचा वाटतो. कांबळीला आजरपणामुळे झगडावं लागलंय. दिग्गज क्रिकेटपटुला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतोय. मात्र कांबळी एकेकाळी कोट्याधीश होता. कांबळीचं नेटवर्थ किती आहे? जाणून घेऊयात.

कांबळीने 1991 साली टीम इंडियासाठी खेळायची सुरुवात केली. कांबळीने अवघ्या काही काळात आपल्या खेळाने छाप सोडली. कांबळीने क्रिकेट आणि अन्य माध्यमातून रग्गड कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कांबळी यशाच्या शिखरावर असताना क्रिकेटरची संपत्ती 1 ते 1.5 मिलियन डॉलर इतकी होती. मात्र 2022 मध्ये कांबळीकडे फक्त 4 लाख रुपये होते.

पेन्शनवर गुजराण

विनोद कांबळीची सध्या आर्थिक स्थिती फार बेताची आहे. कांबळीला सध्या बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनचा मोठा आधार आहे. पेन्शनमधून दरमहा 30 हजार रुपये मिळतात, असं स्वत: कांबळीनेच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

क्रिकेट कारकीर्द

कांबळीने 2009 साली आंतरराष्ट्रीय तर 2011 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटला अलविदा केला.काबंळीने 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. कांबळीने कसोटीत 4 शतकं आणि 3 अर्धशतकांसह 1 हजार 84 धावा केल्या. तर वनडे क्रिकेटमध्ये 2 शतकं आणि 14 अर्धशतकांसह 32.59 च्या सरासरीने 2 हजार 477 धावा केल्या आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.