चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त तीन सामने! रोहित-गंभीर जोडीचा लागणार कस

टी20 वर्ल्डकपनंतर भारताचं पुढचं लक्ष्य हे चॅम्पियन्स ट्रॉफीकडे आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात या स्पर्धेत उतरणार आहे. तसेच गौतम गंभीरचं मार्गदर्शन लाभणार आहे. पण श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची स्थिती नाजूक असल्याचं दिसून आलं. आता टीम इंडियाकडे या स्पर्धेच्या तयारीसाठी फक्त तीन सामने आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त तीन सामने! रोहित-गंभीर जोडीचा लागणार कस
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 4:50 PM

भारत श्रीलंका दौरा नुकताच संपला असून वनडे मालिकेत भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली. तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने 2-0 अशी आघाडी घेतली आणि 27 वर्षानंतर मालिका विजय मिळवला. आता या मालिकेनंतर टीम इंडिया मोठ्या ब्रेकवर आहे. कारण या महिन्यात कोणताच सामना नाही. तसेच पुढच्या महिन्यात थेट 19 सप्टेंबरला कसोटी मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. चेन्नईत बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामनाा खेळणार आहे. त्यानंतर 27 सप्टेंबरला दुसरा कसोटी सामना असणार आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या व्यतिरिक्त या दोन महिन्यात तसं काहीच नाही. त्यामुळे टीम इंडियाला या कालावधीत मोठा ब्रेक मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात टीम इंडियाचं वेळापत्रक व्यस्त असणार आहे. बांग्लादेशविरुद्ध टी20 मालिका आणि न्यूझीलंडचा संघही भारत दौऱ्यावर येणार आहे. असं असताना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी या वर्षात तसं काहीच होणार नाही. इतकंच काय तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी फक्त तीन सामने मिळणार आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रारुप आराखडा पाकिस्तानने आयसीसीकडे दिला आहे. या आराखड्यानुसार ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. तसेच अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखून ठेवला आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या तयारीसाठी भारताकडे फक्त तीन सामने असणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा तीन सामन्यांची वनडे मालिका होईल. यानंतर थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ उतरणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना या स्पर्धेपूर्वी चिंता लागून आहे. भारताची श्रीलंकेतील कामगिरी पाहून तयारीसाठी काही अवधी लागू शकतो, असं म्हणणं आहे. त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर कशा पद्धतीने रणनिती आखतो याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, बांग्लादेश कसोटीपासून टीम इंडियात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं कमबॅक होऊ शकतं.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. प्रारूप आराखड्यानुसार भारत पाकिस्तान सामना 1 मार्चला होणार आहे. पण या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे, ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर होण्याची शक्यता आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.