Rohit Shrama Captaicny : रोहित शर्मा याचा कर्णधारपदावरुन पत्ता कट? कोच राहुल द्रविड म्हणाला…….
न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड याने पत्रकार परिषद घेतली. द्रविडने 3 प्रकारात 3 कॅप्टनबाबत प्रतिक्रिया दिली.
इंदूर : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 24 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने पत्रकार परिषद घेतली. द्रविडने या पत्रकार परिषदेत रोहित शर्माच्या नेतृत्वावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय तिन्ही फॉर्मेट स्वतंत्र कॅप्टन नेमण्याचा विचार करत आहे.
टीम इंडियात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटनुसार स्वतंत्र कॅप्टन नेमणार असल्याच्या वृत्त द्रविडने खोडून काढलं. टीम इंडियाचं गेल्या वर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलं. तेव्हापासून रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या टी 20 करिअरबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. तिघांनीही नोव्हेंबरपासून टी 20 क्रिकेटमध्ये खेळले नाहीत. न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्धच्या मालिकेतही त्यांचा समावेश नव्हता. त्यांतर आता न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या टी 20 मालिकेतही त्यांचा समावेश नाही.
रोहितची कॅप्टन्सी, द्रविडची प्रतिक्रिया
रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याला टी 20 टीमचं कर्णधार केलं जाऊ शकतं. तसेच आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये हार्दिक कर्णधार म्हणून प्रबळ दावेदार आहे. मात्र याबाबत द्रविड काही वेगळंच म्हणाला. ” 3 प्रकारात 3 कर्णधार करण्याबाबत मला काही माहिती नाही. तुम्ही निवड समितीला हा प्रश्न विचारायला हवा. पण मला तरी सध्या असं काही वाटत नाही”, असं द्रविडने स्पष्ट करत हा प्रकार खोडून काढला.
कॅप्टन रोहित काय म्हणाला होता?
आम्हाला न्यूझीलंड विरुद्ध 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. आयपीएलनंतर काय होतंय हे पाहावं लागेल. मी टी 20 क्रिकेट सोडण्याबाबत निर्णय घेतलेला नाही”, अशी प्रतिक्रिया कॅप्टन रोहितने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली होती.
दरम्यान टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
न्यूजीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), फिन एलेन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमैन, डेवोन कॉनवे, जॅकब डफी, लॉकी फर्ग्यूसन, डेरिल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅंटनर, हेनरी शिपले, ईश सोढी आणि ब्लेयर टिकनर.