Rahul Dravid यांचा मुलगा बनला कॅप्टन, जाणून घ्या कुठल्या टीमच करणार नेतृत्व?

सध्या राहुल द्रविड हे टीम इंडियाचे हेड कोच आहेत. राहुल द्रविड यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलालाही क्रिकेटची आवड आहे. त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलय. राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय अवघ्या 13 वर्षांचा आहे.

Rahul Dravid यांचा मुलगा बनला कॅप्टन, जाणून घ्या कुठल्या टीमच करणार नेतृत्व?
Rahul DravidImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 2:57 PM

Rahul Dravid son captain– सध्या राहुल द्रविड हे टीम इंडियाचे हेड कोच आहेत. राहुल द्रविड यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलालाही क्रिकेटची आवड आहे. त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलय. राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय अवघ्या 13 वर्षांचा आहे. द्रविड यांचा मुलगा अन्वयवर एक जबाबदारी सोपवण्यात आलीय. वडिल राहुल द्रविड हे हे़ड कोच असताना, त्यांचा मुलगा आता एका टीमच नेतृत्व करताना दिसणार आहे. अन्वय हा राहुल द्रविड यांचा धाकटा मुलगा आहे. राहुल द्रविड यांच्या मोठ्या मुलाच नाव समित द्रविड आहे. दोन्ही मुलांचा वडिलांप्रमाणे क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याचा प्रयत्न आहे. कर्नाटकचे ते उदयोन्मुख क्रिकेटपटू आहेत. अन्वय अंडर 14 टीममधून खेळतो. अन्वय द्रविडला U-14 झोनल टुर्नामेंटमध्ये कर्नाटक टीमच कॅप्टन बनवण्यात आलं आहे.

समितने वडिलांना क्रिकेट खेळताना पाहिलय

मोठा मुलगा समित द्रविड IPL दरम्यान वडिलांना क्रिकेट खेळताना पाहून मोठा झालय. अन्वयला वडिलांना तितक क्रिकेट खेळताना पाहण्याची संधी मिळाली नाही. दोन्ही मुलांमध्ये वडिलांच क्रिकेटिंग कौशल्य आणि ब्रेन स्पष्टपणे दिसून येतो. अन्यवची ओळख विकेटकीपर बॅट्समनची आहे.

हे सुद्धा वाचा

कुठल्या टीमच नेतृत्व करणार?

घरात राहुल द्रविड यांच्यासारखा क्रिकेटिंग गुरु असेल, तर मुलांना ते कौशल्य आत्मसात करायला फार वेळ लागत नाही. अन्वय द्रवि़डने वडिलांकडूनच क्रिकेटचे बारकावे शिकले आहेत. सध्या तो कर्नाटक अंडर 14 टीमचा भाग आहे. महत्त्वाच म्हणजे U-14 इंटर झोनल टुर्नामेंटसाठी अन्वय द्रविडला कर्नाटक टीमच कॅप्टन बनवण्यात आलय.

मोठ्या मुलाला क्रिकेट व्यतिरिक्त अजून काय आवडतं?

समित द्रविडच उदयोन्मुख क्रिकेटर म्हणून कर्नाटक क्रिकेटमध्ये नाव घेतलं जातं. तो राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा आहे. त्याच्या बॅटिंगमध्ये वडिलांची झलक दिसून येते. त्याने वडिलांकडूनच क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. क्रिकेटशिवाय समितला फिरण्याची, म्युझिक आणि स्विमिंगची आवड आहे. दोन्ही भावाची मिळून द्विशतकी भागीदारी

U-14 इंटर झोनल टुर्नामेंट अन्वय द्रविडला आता कॅप्टन बनवलय. दोन वर्षांपूर्वी मोठा भाऊ समितसोबत मिळून त्याने धमाकेदार बॅटिंग केली होती. ती BTR Shield अंडर 14 स्कूल टुर्नामेंट होती. या टुर्नामेंटच्या एका मॅचमध्ये या दोन्ही भावांनी द्विशतकी भागीदारी केली होती. यात विकेटकीपर बॅट्समन अन्वयने 90 धावा फटकावल्या होत्या. या दोन्ही भावांच्या प्रदर्शनामुळे त्यांची टीम स्कूल टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.