WI vs IND 5th T20 | वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीज गमावली, टीम इंडियाच्या पराभवाची 3 मुख्य कारणं
WI vs IND 5th T20 | टीम इंडियाने सीरीजमध्ये लेव्हल केली होती. पण अखेरच्या सामन्यात विडिंजने मारली बाजी. या संपूर्ण सीरीजमध्ये टीम इंडियाला एखादा सामना वगळता चांगली ओपनिंग स्टार्ट मिळाली नाही.
फ्लोरिडा : टीम इंडियाच्या हातून वेस्ट इंडिज दौऱ्यावर क्लीन स्वीपची संधी निसटली. टेस्ट आणि वनडे सीरीज जिंकणाऱ्या टीम इंडियाला टी 20 सीरीजमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा सीरीजमध्ये 2-3 ने पराभव झाला. वेस्ट इंडिजने सीरीजच्या शेवटच्या सामन्यात भारताचा 8 विकेटने पराभव केला. 6 वर्षानंतर वेस्ट इंडिजने टीम इंडिया विरुद्ध T20 सीरीज जिंकली. टीम इंडियाच्या पराभवाची 3 मुख्य कारणं काय? जाणून घेऊया.
फ्लोरिडामध्ये रविवारी सीरीजमधला शेवटचा आणि पाचवा टी 20 सामना खेळला गेला. हा निर्णायक सामना होता. कारण सीरीज 2-2 अशी बरोबरीत होती. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. विडिंज समोर विजयासाठी 166 धावांच लक्ष्य ठेवलं. वेस्ट इंडिजने 18 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं.
भारताच्या पराभवाची तीन कारणं
या संपूर्ण सीरीजमध्ये टीम इंडियाला एखादा सामना वगळता चांगली ओपनिंग स्टार्ट मिळाली नाही. हे पराभवाच एक मुख्य कारण आहे. फक्त चौथ्या टी 20 सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल या दोघांनी 165 धावांची ओपनिंग पार्ट्नरशिप केली. शुभमन गिल आणि इशान किशनने पहिल्या दोन सामन्यात ओपनिंग केली. पण ते फेल झाले. यशस्वी आणि शुभमनने अन्य तीन सामन्यात ओपनिंग केली. गिलने 5 इनिंगमध्ये 102 धावा केल्या. यात एका सामन्यात 77 धावा फटकावल्या. यशस्वी जैस्वालने 3 सामन्यात 90 धावा केल्या. यात एका मॅचमध्ये 84 रन्स आहेत. इशानने 2 इनिंगमध्ये फक्त 32 धावा केल्या.
पराभवाच दुसरं कारण
हार्दिक पांड्या कॅप्टन म्हणून आपल्या निर्णयापेक्षा प्रदर्शनावर नाखूश असेल. या संपूर्ण सीरीजमध्ये तो बॅटने कमाल करु शकला नाही किंवा बॉलिंगमध्ये कमाल करु शकला. हार्दिकने 4 इनिंगमध्ये फक्त 77 धावा केल्या. यात त्याचा स्ट्राइक रेट 110 चा होता. 5 सामन्यात 15 ओव्हरमध्ये फक्त 4 विकेट घेतल्या. शेवटच्या सामन्यात 18 चेंडूत फक्त 14 धावा केल्या. 3 ओव्हरमध्ये 32 धावा दिल्या. अक्षर पटेलचा बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये विचित्र पद्धतीने वापर केला. संजू सॅमसनला या सीरीजमध्ये भरपूर संधी मिळाली. पण तो संधीचा फायदा उचलण्यात अपयशी ठरला. त्याला 3 इनिंगमध्ये बॅटिंगची संधी मिळाली. पण त्याने फक्त 32 धावा केल्या. यात 13 ही त्याची मोठी धावसंख्या आहे. पराभवाच तिसरं कारण
टीम इंडियाने या सीरीजमध्ये चांगली गोलंदाजी केली. पण त्यात युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेलच विशेष योगदान नव्हतं. दोघेही महागडे ठरले. शेवटच्या सामन्यात चहलने 4 ओव्हर्समध्ये 51 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाला नाही. चहलने 5 सामन्यात 5 विकेट घेतल्या. अक्षरला 4 इनिंगमध्ये 11 ओव्हर मिळाल्याने. त्याने फक्त 2 विकेट काढले.