सरकारने अशी कुठली चिठ्ठी पाठवली, ज्यामुळे BCCI च होणार कोट्यवधींच नुकसान, काय आहे त्यात?

बीसीसीआयकडे भरपूर पैसा आहे. बीसीसीआय जगातील एक श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयकडे पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. पण आता यातला एक मार्ग बंद होऊ शकतो. कारण भारत सरकारने बीसीसीआयला एक चिठ्ठी पाठवली आहे.

सरकारने अशी कुठली चिठ्ठी पाठवली, ज्यामुळे BCCI च होणार कोट्यवधींच नुकसान, काय आहे त्यात?
jay shah bcci
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 11:00 AM

बीसीसीआय जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, त्यांची कमाई हजारो-करोडोंमध्ये आहे. जागतिक क्रिकेटमधील T20 लीग, आयपीएलमधून बीसीसीआय प्रचंड पैसा कमावते. टीम इंडियाच्या सामन्यांच प्रसारण, अन्य डील आणि स्पॉन्सर्सकडून बीसीसीआय दरवर्षी भरपूर पैसा कमावते. त्याशिवाय आयसीसीच्या रेवेन्यू पूलमधून बीसीसीआयला भरपूर पैसा मिळतो. म्हणजे पैसाच पैसा. पण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या कमाईचा एक हिस्सा कमी होऊ शकतो. त्यांना कोट्यवधीच नुकसान होऊ शकतं. त्याचं कारण भारत सरकारच्या डिपार्टमेंटकडून आलेली एक चिठ्ठी.

भारत सरकारच्या आरोग्य सेवा निर्देशालय DGHS ने बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना गुरुवारी 1 ऑगस्टला चिठ्ठी पाठवली. तंबाखू उत्पादनांना प्रोत्साहन देऊ नका, असं DGHS ने भारतीय बोर्डाला म्हटलं आहे. बीसीसीआयचे जितके स्पॉन्सर आहेत, त्यातल्या अनेक कंपन्या तंबाखू उत्पादन करतात. अशा कंपन्यांचे जाहीरातीचे पोस्टर अनेकदा टीम इंडिया किंवा आयपीएल सामन्यांच्यावेळी मैदानात पहायला मिळतात.

काय म्हटलय चिठ्ठीत?

फक्त बीसीसीआयच्या जाहीरातीच नाही, तर भारताचे अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटू तंबाखू आणि दारु कंपन्यांच्या जाहीरातींमध्ये दिसतात. या विरोधातही अनेक संस्थांनी वेळोवेळी आवाज उठवलाय. अखेर आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात पाऊल उचललय. DGHS चे महासंचालक डॉ अतुल गोयल यांनी बीसीसीआयला चिठ्ठी पाठवलीय. त्यात त्यांनी लिहिलय की, ‘भारत संपूर्ण जगात तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे’

मागण्या काय आहेत?

भारतात क्रिकेटर्सकडे रोल मॉडल म्हणून पाहिलं जातं. क्रिकेट, क्रिकेटर्सकडून फिटनेस आणि आरोग्यदायी लाइफस्टाइल प्रमोट होते. पण आयपीएल सारख्या स्पर्धांमध्ये या क्रिकेटर्सना तंबाखू उत्पादनांच्या जाहीरातीत सहभाही होताना पाहण दु:खद आहे, असं DGHS ने आपल्या चिठ्ठीत लिहील आहे. बीसीसीआय तंबाखूच्या जाहीरातींच प्रमोशन रोखू शकते, असं डॉ. गोयल यांनी लिहिलं आहे. स्टेडियममध्ये अशा जाहीरातींच प्रदर्शन रोखलं पाहिजे असही म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.