AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah : Holi सणामध्ये जसप्रीत बुमराहबद्दल आली मोठी Good News

Jasprit Bumrah injury update : भारतीय फॅन्सना सुखावणारी काय आहे ती बातमी? जसप्रीत बुमराहमुळे बीसीसीआय, टीम इंडिया सर्वच टेन्शनमध्ये होते. तो टीम इंडियाचा आधारस्तंभ आहे. एकहाती सामना फिरवण्यात कुवत असलेला तो खेळाडू आहे.

Jasprit Bumrah : Holi सणामध्ये जसप्रीत बुमराहबद्दल आली मोठी Good News
jasprit bumrah Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 8:26 AM

Jasprit Bumrah injury update : संपूर्ण देशात होळीचा उत्साह आहे. या दरम्यान जसप्रीत बुमराह आणि त्याच्या फॅन्ससाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच महिन्यांपासून पाठदुखीने त्रस्त असलेल्या जसप्रीत बुमराहच ऑपरेशन यशस्वी झालं आहे. न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च शहरातील हॉस्पिटलमध्ये जसप्रीत बुमराहवर शस्त्रक्रिया झाली. फॉर्टे ऑर्थोपेडिक्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रोवॅन शूटन यांनी हे ऑपरेशन केलं. ही सर्जरी यशस्वी ठरलीय. जसप्रीत बुमराह स्ट्रेस बॅक फ्रॅक्चरने हैराण होता.

आता प्रश्न हा आहे की, जसप्रीत बुमराह या यशस्वी सर्जरीनंतर मैदानात कधी परतणार? क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार, जसप्रीत बुमराहला पूर्णपणे फिट होण्यासाठी जास्तीत जास्त 24 आठवडे म्हणजे 6 महिने लागतील. जसप्रीत बुमराह त्याआधी सुद्धा फिट होऊ शकतो.

वर्ल्ड कप खेळू शकेल का बुमराह?

बुमराह 6 महिन्यानंतर पूर्ण फिटनेससह मैदानात उतरला, तर ती चांगली बाब असेल. तो वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताच प्रतिनिधीत्व करु शकतो. भारतात ऑक्टोबर महिन्या वनडे वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंट सुरु होणार आहे. बुमराह टीम इंडियाच्या मोठ्या मॅचविनरपैकी एक आहे. जसप्रीत बुमराह फिट झाला, तर टीम इंडियाच्या विजयाची शक्यता अधिक वाढते.

कुठल्या महत्त्वाच्या स्पर्धांना मुकला?

जसप्रीत बुमराहवर हे ऑपरेशन आताच झालय. त्यामुळे तो आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसणार नाही. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कपमध्येही सहभागी होणार नाही. मागच्यावर्षी इंग्लंड दौऱ्यावर असताना जसप्रीत बुमराहचा पाठदुखीचा त्रास बळावला होता. बुमराह मागच्यावर्षी आशिया कप त्यानंतर टी 20 वर्ल्ड कपमध्येही खेळू शकला नाही. कोणाच्या सल्ल्याने बुमराहला न्यूझीलंडला पाठवलं?

जसप्रीत बुमराहला मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी कोच आणि न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्डच्या सल्ल्यावरुन क्राइस्टचर्चला पाठवण्यात आलं होतं. ज्या डॉक्टरने बुमराहवर ऑपरेशन केलं, त्यांनी जोफ्रा आर्चर, जेम्स पॅटिंसन, जेसन बेहरनडॉर्फ या गोलंदाजांवर शस्त्रक्रिया केली आहे.

27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात.
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा.
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे.
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल.
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.