World Cup 2023 स्पर्धेदरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळणार सुट्टी! बीसीसीआयने निर्णय घेतला कारण..
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशला पराभवाची धूळ चारली आहे. आता पुढचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआयच्या गोटातून एक बातमी समोर आली आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. रॉबिन राउंड फेरीत चार पैकी चार सामने जिंकत उपांत्य फेरीची शर्यत कायम ठेवली आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना 22 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे विजयी संघ गुणतालिकेत अव्वल स्थान गाठणार आहे. त्याचबरोबर उपांत्य फेरीची वाट आणखी सोपी होणार आहे. गुणतालिकेत 8 गुणांसह +1.923 नेट रनरेटसह न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानी, तर 8 गुण आणि +1.659 नेट रनरेटसह भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघ अव्वल स्थानासाठी भिडणार आहेत. या सामन्यानंतर दोन्ही संघांचे फक्त चार सामने शिल्लक राहणार आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतकर टीम इंडियाच्या खेळाडूंना सुट्टी दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूंना या कारणामुळे मिळणार सुट्टी!
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर भारत इंग्लंड सामना होणार आहे. हा सामना 29 ऑक्टोबरला लखनऊमध्ये होणार आहे. म्हणजेच या सामन्यासाठी आठवडाभराचा अवधी शिल्लक असणार आहे. त्यामुळे खेळाडूंना दोन ते तीन दिवसांचा ब्रेक देणयाचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याचं सूत्रांची माहिती आहे. या दरम्यान खेळाडू घरी जाऊन कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. सर्व खेळाडू 26 ऑक्टोबरला पुन्हा एकदा लखनऊमध्ये एकत्र येतील.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत एकमेव संघ असा आहे की, साखळी फेरीतील सामने वेगवेगळ्या ठिकाणी खेळत आहे. त्यामुळे वर्कलोड पाहता सराव शिबिराचं वेळ निश्चित करण्यात आली आहे. खेळाडू सामन्याच्या 48 तासांपूर्वी ट्रेनिंग सेशनमधये भाग घेतात. तर 24 तासांपूर्वी फक्त तेच खेळाडू सराव ते रिझर्व्ह संघासोबत आहेत. खासकरून गोलंदजांचा वर्कलोड व्यवस्थितरित्या मॅनेज केलेला आहे.
दुसरीकडे, हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने भारताच्या गोटात चिंता आहे. दुखापत गंभीर नसली तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. तसेच रिकव्हरीसाठी बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवलं जाणार आहे. हार्दिक पण ब्रेकनंतर लखनऊमध्ये टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये दाखल होईल.