Sanju Samson | संजू सॅमसन याचं दक्षिण आफ्रिके विरुद्ध झुंजार अर्धशतक
Sanju Samson Fifty | संजू सॅमसन याने 97 मिनिटं मैदानात संघर्ष करत टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण अशा 50 धावा केल्या. संजूच्या या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेला चांगली टक्कर देता आली.
पार्ल | टीम इंडियाचा ना युवा ना अनुभवी फलंदाज संजू सॅमसन याने दक्षिण आफ्रिके विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झुंजार अर्धशतक ठोकलं आहे. संजूने निर्णायक क्षणी टीम इंडिया अडचणीत असतानना हा अर्धशतकी खेळी साकारली. संजूला गेल्या अनेक सामन्यांपासून आपल्या भूमिकेला न्याय देत येता नव्हता. मात्र अखेर संजूने योग्य वेळी टीमला गरज असताना मैदानात टिकून अर्धशतक ठोकलंय.
संजूच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे चौथं अर्धशतक ठरलं. संजूने हे अर्धशतक 97 मिनिटांमध्ये 66 चेंडूत पूर्ण केलं. संजूने या दरम्यान 75.76 च्या स्ट्राईक रेटने ही अर्धशतकी खेळी साकारली. संजूने 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक केलं. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यानंतर तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाची ओपनिंग जोडी पुन्हा फ्लॉप ठरली. डेब्युटंट रजत पाटीदार आणि साई सुदर्शन या सलामी जोडीने 34 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर दोघेही ठराविक अंतराने आऊट झाले. रजत 22 आणि साई 10 धावा करुन आऊट झाले.
त्यानंतर संजूने कॅप्टन केएल राहुल याच्या मदतीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केएलला अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र केएलला मोठी खेळी करता आली नाही. संजू आणि केएल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. केएल 21 धावा करुन आऊट झाला.
त्यानंतर संजूने तिलकसह चौथ्या विकेटसाठी टिच्चू खेळी केली. या दरम्यान संजूने अर्धशतक ठोकलं. संजूकडून आता क्रिकेट चाहत्यांना पहिल्यावहिल्या शतकाची प्रतिक्षा आणि आशा आहे.
संजूचा संघर्ष आणि अर्धशतक
FIFTY!@IamSanjuSamson brings up his 4th ODI half-century off 66 deliveries.
Live – https://t.co/nSIIL6g1Pj #SAvIND pic.twitter.com/UIrSwncorG
— BCCI (@BCCI) December 21, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.