IND vs SL | Asia Cup Final आधी पडद्यामागे मोठ्या हालचाली, सामन्याआधी तब्बल तीन तास चर्चा
Asia Cup Final 2023 : भारत आणि श्रीलंकेमध्ये आज आशिया कपचा फायनल सामना होणार आहे. मात्र त्याआधी पडद्यामागे मोठ्या हालचाली घडताना दिसल्या. अजित आगरकर, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशासाठी झाली जाणून घ्या.

मुंबई : आशिया कप 2023 चा फायनल सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. महामुकाबला कोलंबोमधील प्रेमदासा मैदानावर होणार आहे. या सामन्याआधी पडद्यामागे मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर, मुख्य कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. आशिया कप फायनल सामन्याबाबत चर्चा झालीच त्यासोबतच आगामी वर्ल्ड कप आधी होणाऱ्या ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेबाबतही चर्चा झाली.
नेमकी कशावर चर्चा झाली?
आशिया कपमधील फायनल सामन्यानंतर भारताची तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेच्या संघ निवडीसाठी जो संघ निवडला जाणार त्यावर चर्चा झाली. या वन डे मालिकमध्ये तीन सामने होणार असून सध्या संघातील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या श्रेयस अय्यर याच्या दुखापतीबाबत काय अपडेटस् आहेत. वन डे मालिकेमध्ये जो संघ निवडला जाईल बहुतेक तसाच संघ वन डे मध्ये दिसेल.
निवडकर्ते या मालिकेसाठी लवकरात लवकर संघ जाहीर करणार आहेत. कारण ही मालिका 22 सप्टेंबरपासून मोहालीत सुरू होणार आहे. दुसरा वनडे 24 सप्टेंबरला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर तर तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.
दरम्यान, श्रेयस अय्यरची दुखापत डोकेदुखी ठरत आहे. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव याला संधी द्यावी तर त्याला वन डे मध्ये छाप पाडता आली नाही. सूर्या टी-20 मध्ये गोलंदाजांची धुलाई करतो तशी कामगिरी वन डेमध्ये त्याला करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे या मालिकेमध्ये मधल्या फळीमध्ये कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारताचा वर्ल्ड कपसाठी संघ- : रोहित शर्मा (C), हार्दिक पांड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.