Shubaman-Sara | शुबमन आणि सारा रिलेशनशिपमध्ये? दोघांकडून ‘तो’ फोटो शेअर
टीम इंडियाचा स्टार बॅट्समन शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर या दोघांच्या नावाची कायमच सोशल मीडियावर चर्चा असते.आता पुन्हा दोघे चर्चेत आले आहेत.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुबमन गिल आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर या दोघांच्या नावाची कायम सोशल मीडियावर चर्चा असते. शुबमन सातत्याने शानदार कामगिरी करतोय. शुबमनने अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेत. शुबमन आणि सारा हे दोघेही रिलेशनमध्ये असल्याचं नेटकऱ्यांकडून कायम म्हटलं जातं. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शुबमन याने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमुळे सारा आणि शुबमन दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
शुबमनने लंडनमधील एका कॅफेमधील फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे सारा तेंडुलकरने सुद्धा असाच एक फोटो शेअर केला होता. ज्यामुळे नेटकरी म्हणतायेत की या दोघांची जोडी जमलीय.
शुबमनने 14 फेब्रुवारीला एक फोटो शेअर केला. हा फोटो लंडनमधील एका कॅफेतील आहे. “आज कोणता दिवस आहे?” शुबमन याने असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. शुबमन याचा हा फोटो व्हायरल झाला आहे. तसेच ही जागा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. कारण साराने 2021 मध्ये याच कॅफेतील फोटो शेअर केला होता.
Shubman Gill posting the pic clicked by Sara Tendulkar in 2021 that too on Valentine's day. ? pic.twitter.com/iGYYt7u5k2
— feryy (@ffspari) February 14, 2023
साराने 5 जुलै 2021 ला कॅफेतील फोटो शेअर केला होता. दोघांनी एकाच ठिकाणी सेम पोज देत फोटो काढलाय. आता जेव्हा शुबमनचा फोटो व्हायरल झाला, तेव्हा नेटकरी जुन्या फोटोवर कमेंट करत आहेत. “भावा चोरी पकडली गेलीय”, असंही काहींनी म्हटलंय.
शुबमनचा धडाका
शुबमन गिल सातत्याने धमाकेदार कामगिरी करतोय. गिलने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 7 धावा तर तिसऱ्या मॅचमध्ये 46 रन्स केल्या. त्यानंतर श्रीलंका विरुद्धच 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये अनुक्रमे 70, 21 आणि 116 अशा धावा केल्या.
तर यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये शुबमनने भीमपराक्रम केला. शुबमने द्विशतक ठोकलं. शुबमनने 149 बॉलमध्ये 208 धावांची खेळी केली.
शुबमन यासह सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, इशान किशन याच्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा पाचवा भारतीय ठरला. तसेच शुबमनने कमी वयात वनडे डबल सेंच्युरी ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही केला.
शुबमनने यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या पुढील 2 सामन्यांमध्ये अनुक्रमे 40 आणि 112 धावा केल्या. शुबमनने 3 सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याच्या विक्रमाची बरोबरी केली.