WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, एका मोठ्या खेळाडूच टेस्ट करियर संपल्यात जमा
India Squad WTC Final 2023 : BCCI च्या सिलेक्शन कमिटीने झटक्यात एका खेळाडूला सरळ दाखवला बाहेरचा रस्ता. हा निर्णय सिलेक्शन कमिटीची मोठी चूक ठरु शकतो. तो प्लेयर एक्स फॅक्टर ठरला असता.
India Squad WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी सिलेक्टर्सनी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा सामना 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. टीम इंडियाची घोषणा होताच, भारताच्या एका खेळाडूच टेस्ट करियर जवळपास संपल्यात जमा आहे. सिलेक्टर्सनी अचानक एका खेळाडूला भारताच्या टेस्ट टीम बाहेरचा रस्ता दाखवलाय.
सिलेक्टर्सनी एक मोठा निर्णय घेतलाय. मिस्टर 360 डिग्रीच्या नावाने प्रसिद्ध सूर्यकुमार यादवला टेस्ट टीममधून ड्रॉप केलय. WTC च्या फायनलसाठी निवडलेल्या टीममध्ये त्यांनी सूर्यकुमार यादवला स्थान दिलेलं नाही. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यानंतर सूर्यकुमार यादव त्या जागेसाठी दावेदार मानला जात होता.
सिलेक्टर्सची मोठी चूक ठरेल
पण सिलेक्टर्सनी अचानक सूर्यकुमारच्या जागी अजिंक्य रहाणेला प्राधान्य दिलय. अजिंक्य 15 महिन्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. सूर्युकमार यादव सारख्या स्फोटक फलंदाजाची निवड न करणं ही सिलेक्टर्सची मोठी चूक ठरु शकते. कारण एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे.
दाखवला बाहेरचा रस्ता
सूर्यकुमार यादवला भारताकडून फक्त एक टेस्ट मॅचमध्ये संधी मिळालीय. त्यात त्याने फक्त 8 रन्स केल्या. नागपूरच्या टर्निंग पीचवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सूर्यकुमार यादवची कमजोरी उघड झाली. सूर्यकुमार पहिल्या टेस्ट मॅचमध्ये सुपर फ्लॉप ठरला. नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियन स्पिनर्ससमोर सूर्यकुमारच फार काही चाललं नाही. एक टेस्ट मॅचनंतर पुन्हा सूर्यकुमार यादवला टीममध्ये संधी नाही मिळाली.
एक्स फॅक्टर ठरला असता
सूर्यकुमार यादवकडे वेगवान गोलंदाजी खेळण्याच चांगलं टेक्निक आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो एक्स फॅक्टर ठरला असता. पण सिलेक्टर्सनी त्याला संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लियॉनने सूर्यकुमारला 8 रन्सवर क्लीन बोल्ड केलं. सूर्यकुमारने त्याच्या पहिल्याच टेस्टमध्ये 20 चेंडूत 8 धावा करताना फक्त एक चौकार मारला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारताची 15 सदस्यीय टीम
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.