Amit Mishra : ‘मी शुभमन गिलचा द्वेष करत नाही, पण….’, अमित मिश्राला नेमकं काय म्हणायचय?

Amit Mishra : टीम इंडियाने नुकतीच शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका 4-1 च्या फरकाने जिंकली. पुढचा कॅप्टन म्हणून शुभमन गिलकडे पाहतोय, हे संकेत बीसीसीआयने यातून दिले आहेत. पण टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूला काही आक्षेप आहेत. त्याने शुभमन गिलबद्दल स्पष्टपणे आपली मत मांडली आहेत.

Amit Mishra : 'मी शुभमन गिलचा द्वेष करत नाही, पण....', अमित मिश्राला नेमकं काय म्हणायचय?
shubman gill
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 9:52 AM

नुकतीच टीम इंडियाने झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका 4-1 च्या फरकाने जिंकली. कर्णधार म्हणून शुभमन गिलची ही पहिलीच सीरीज होती. या सीरीजमध्ये शुभमन गिलला बॅटने विशेष कमाल करता आली नाही. सीरीजमध्ये सर्व सामने खेळत गिलने 125.92 च्या स्ट्राइक रेटने 170 धावा केल्या. आयपीएल 2024 च्या सीजनमध्ये शुभमन गिलला दमदार प्रदर्शन करता आलं नाही. त्यामुळे त्याला T20 वर्ल्ड कप 2024 च्या टीममध्ये स्थान मिळू शकलं नाही. 147.40 च्या स्ट्राइक रेटने गिलने 426 धावा केल्या. गुजरात टायटन्सचा कॅप्टन म्हणून गिलचा हा पहिलाच सीजन होता. क्रमवारीत त्यांना आठव्या स्थानावर समाधान मानाव लागलं.

टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने गिलने संदर्भात काही मत मांडली आहेत. “आयपीएलमधील प्रदर्शनाच्या आधारावर मी गिलला कॅप्टन करणार नाही. मी त्याला आयपीएलमध्य बघितलय. त्यामुळे मी त्याला कॅप्टन बनवणार नाही. कॅप्टनशिप कशी करायची? हे गिलला कळत नाही” असं अमित मिश्रा युट्यूब शो मध्ये म्हणाला.

कॅप्टनशिपचे गुण दिसले नाहीत

“तो फक्त भारतीय संघाचा भाग आहे, म्हणून त्याला कॅप्टन बनवू नये. मागच्या काही सीजनमध्ये गिलने आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन केलय. भारतीय संघातून खेळतानाही त्याने चांगली कामगिरी केलीय. नेतृत्वाचा अनुभव द्यायचा होता, म्हणून त्याला भारतीय संघाच कर्णधार बनवण्यात आलं. गुजरात टायटन्सच नेतृत्व करताना हे गुण त्याच्यामध्ये दिसले नाहीत” असं अमित मिश्रा म्हणाले.

‘मी गिलचा द्वेष करत नाही, पण…’

अमित मिश्राने हे स्पष्ट केलं की, “गिल त्याला प्लेयर म्हणून आवडतो. पण ऋतुराज गायकवाड T20 ओपनर म्हणून जास्त चांगला आहे” गिल विरुद्ध गायकवाड या बद्दल बोलताना अमित मिश्रा म्हणाला की, “मी गिलचा द्वेष करत नाही. प्लेयर म्हणून मला तो आवडतो. पण गायकवाड मला त्याच्यापेक्षा जास्त चांगला वाटतो. कारण परिस्थितीनुसार, तो धावा बनवतो”

महाराष्ट्राच्या खेळाडूवर जास्त विश्वास

“T20 वर्ल्ड कपच्या स्क्वाडमध्ये शुभमन गिलच्या जागी गायकवाडला राखीव ओपनर म्हणून ठेवायला पाहिजे होतं. तो एक पूर्ण प्लेयर असून टीममध्ये तो एक शांतता आणू शकतो. गरज असेल तेव्हाच, अन्यथा तो धोकादायक फटके खेळत नाही. मला असं वाटतं की, तो तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताच प्रतिनिधीत्व करु शकतो” असं अमित मिश्रा म्हणाला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.