Team India : टीम इंडियाच्या मुख्य कोचपदी वीरेंद्र सेहवाग हवा, सोशल मीडियावर एकच चर्चा!
विराट कोहली असताना सेमी फायनल, फायनलमधील सामने भारताने गमावले होते. टीम मॅनेजमेंटने बदल म्हणून कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवलं. मात्र तरीही काही मोठी कामगिरी संघाला करता आली नाही.
मुंबई : टीम इंडियाची गेली 10 वर्षातील कामगिरी पाहता बाद फेरीमध्ये मुख्य खेळाडू सपशेल फेल जाताना दिसत आहेत. गेल्या 10 वर्षात संघाने साखळी फेरीत दमदार कामगिरी करत बाद फेरीत प्रवेश केलेला पण त्यानंतर मोक्याच्या क्षणी संघ नांगी टाकत आहे. विराट कोहली असताना सेमी फायनल, फायनलमधील सामने भारताने गमावले होते. टीम मॅनेजमेंटने बदल म्हणून कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवलं. मात्र तरीही काही मोठी कामगिरी संघाला करता आली नाही.
टी-20 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधील झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार बदलण्यापेक्षा संघ महत्त्वाच्या सामन्यात का अयशस्वी ठरत आहे? याचा उत्तर शोधणं गरजेचं आहे. जो संघ साखळी फेरीत एकदम दर्जेदार खेळ करत आलेला असतो त्याच संघाची मेन सामन्यामध्ये दाणादाण कशीकाय उडते? संघातील खेळाडूंवर दडपण येत आहे का?
View this post on Instagram
100 पेक्षा जास्त सामने खेळण्याच्या अनुभव असलेले खेळाडूही बाद होत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली तर फायनल आणि सेमीफायनलसारख्या मॅचमध्ये फ्लॉप जात आहेत. दडपण घेण्यापेक्षा बिंधास्त खेळले तर निकाल कदाचित वेगळा लागू शकतो. फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर वीरेंद्र सेहवाग याला कोच करण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केलीय.
दरम्यान, वीरेंद्र सेहवागची फलंदाजी करण्याची स्टाईल सर्वांनाच माहिती आहे. समोर कोणताही बॉलर असूदेत अजिबात दडपण न घेता त्याने फलंदाजी केली आहे. अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज टीम इंडियाला आहे. त्यामुळे सेहवागला कोच करण्यात यावं असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.