IND vs NZ : टीम इंडियाचं ‘मिशन पुणे’, दुसरा सामना केव्हा?

India vs New Zealand 2nd Test : न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत करत भारत दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझीलंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसरा सामना हा पुढील काही तासांमध्येच होणार आहे. जाणून घ्या.

IND vs NZ : टीम इंडियाचं 'मिशन पुणे', दुसरा सामना केव्हा?
india flag cricketImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 9:09 PM

टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभवाने सुरुवात झाली. उभयसंघातील सलामीचा सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडला. पहिल्या सामन्यातील पहिला दिवस हा पावसामुळे वाया गेला. मात्र त्यानंतरही पाचव्या दिवशी पहिल्याच सत्रात सामन्याचा निकाल लागला. न्यूझीलंडने विजयासाठी मिळालेलं 107 धावांचं आव्हान 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडने या विजयासह 36 वर्षांची प्रतिक्षा संपवत 1988 नंतर भारतात पहिला विजय संपादन केला. तसेच न्यूझीलंडने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला मायदेशात मालिका पराभव टाळायचा असेल, तर उर्वरित 2 सामने जिंकणं बंधनकारक आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यीतील उर्वरित दोन्ही सामने हे महाराष्ट्रात होणार आहेत. तिसरा आणि अंतिम सामना हा मुंबईत दुसरी कसोटी पुण्यात होणार आहे. दुसरा सामना हा 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

वॉशिंग्टन सुंदरची एन्ट्री

दरम्यान दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी संघात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याचा समावेश करण्यात आला आहे. वॉशिंग्टनने रणजी ट्रॉफीत शतकी खेळी केली. त्यानंतर काही तासांनीच वॉशिंग्टनला भारतीय संघात संधी मिळाली. आता या पराभवानंतर टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हनमध्ये वॉशिंग्टन सुंदरला संधी देते का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी टीम इंडिया : a रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.

दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.