SA vs IND | साऊथ आफ्रिकेचा बर्गर कोहलीच्या अंगावर धावून गेला, व्हिडीओ तुफान व्हायरल
Virat Kohli and Nandre Burger Fight in Ground | टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी मालिकेदरम्यान मोठा वाद पाहायला मिळाला. साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजाने थेट कोहलीसोबत पंगा घेतला.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्याच दिवशी खूप काही घडलं आहे. एकाच दिवशी दोन टीम ऑल आऊट त्यानंतर परत दुसऱ्यांदा बॅटींग करायला गेल्यावरही यजमान आफ्रिका संघाच्या तीन विकेट गेल्या आहेत. टीम इंडियाकडे अजुन 36 धावांची आघाडी असून कसोटीला आणखी चार दिवस बाकी आहेत. आजच्या दिवशी मैदानावर टशनगही पाहायला मिळाली. साऊथ आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर याने थेट किंग कोहलीसोबत पंगा घेतला.
पाहा व्हिडीओ-
No Burger, Not to Him 🍔
LEADER VIRAT KOHLIhttps://t.co/Q2e9r93dvv
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) January 3, 2024
Oh Burger! Buddy pick your fights wisely!#INDvsSA #SouthAfrica #India pic.twitter.com/rTkdYbNyhK
— Stump Talk (@Stumptalktous) January 3, 2024
नेमकं काय झालंं?
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकेला 55 धावांवर ऑल आऊट केलं. त्यानंतर बॅटींगला उतरल्यावर टीम इंडियाचीसुद्धा काही खास सुरूवात झाली नाही. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा आऊट झाले. कोहली मैदानात आल्यावर नांद्रे बर्गर गोलंदाजी करत होता. पहिल्याच बॉल कोहलीने मस्त डिफेंड केला तो थेट एक टप्पा बर्गरच्या हातात गेला.
कोहली जाग्यावरच उभा होता तरीसुद्ध बर्गर याने त्याच्याकडे खुन्नसने पाहत थ्रो करण्याची अॅक्शन केली. कोहली त्यावर जास्त काही रिअॅक्ट नाही झाला. त्यानंतर कोहलीने त्याला खणखणीत चौकार मारले. या टशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांनीही अनेक मीम्स शेअर केले असून बर्गरची फिरकी घेत आहे. बर्गरला कोहलीबद्दल माहिती नाही असं वाटत आहे, अशा कमेंट्स करत आहेत. ा
दोन्ही संगांची प्लेइंग 11
डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार