Icc World Cup 2023 | वर्ल्ड कप स्पर्धेआधी टीम इंडियासाठी गूडन्यूज, ऋषभ पंत याचा व्हीडिओ व्हायरल
Rishabh Pant Comeback | टीम इंडियासाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्याबाबत मोठी अपडेटय
मुंबई | क्रिकेट टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर आता वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्याला अजून वेळ आहे. आयपीएल आणि wtc final नंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना आता थोडा विश्रांतीसाठी वेळ मिळाला आहे. या दरम्यान टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्सन ऋषभ पंत याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नक्की काय ही अपडेट आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडियाच्या ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 रोजी रस्ते अपघात झाला होता. ऋषभला या अपघातात फार मार लागला होता. सुदैवाने ऋषभ वेळीच कारमधून बाहेर पडल्याने अनर्थ टळला. कारण त्यानंतर गाडीने पेट घेतला होता. या अपघातानंतर ऋषभवर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर पंत सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितलं. आता पंत गेल्या महिन्यापासून टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी बंगळुरुतील एनसीएमध्ये पोहचला. या दरम्यान पंतने सोशल मीडियावर आपला एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.
या व्हायरल व्हीडिओत पंत आधी जिन्याच्या कठड्याच्या मदतीने जिने चढताना दिसतोय. तर दुसऱ्या पोस्टमध्ये पंत कशाचाही आधार न घेता जिने चढण्याचा प्रयत्न करतोय. पंतने गेल्या काही महिन्यात भरभर रिकव्हरी केलीय. टीम इंडियाला काही महिन्यांनी वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे. आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर पंतची प्रगती टीम इंडियासाठी दिलासादायक असल्याचं समजलं जातंय.
ऋषभने या व्हायरल व्हीडिओला “साध्या गोष्टी कधीकधी कठीण होऊ शकतात”, असं कॅप्शन दिलंय. पंतचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. टीम इंडियाला नुकताच ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
ऋषभ पंत याचा व्हीडिओ
Not bad yaar Rishabh ❤️❤️?. Simple things can be difficult sometimes ? pic.twitter.com/XcF9rZXurG
— Rishabh Pant (@RishabhPant17) June 14, 2023
या सामन्यादरम्यान टीम इंडिया चांगलीच अडचणीत सापडली होती. त्यावेळेस टीम इंडियाच्या चाहत्यांना ऋषभ पंतची आठवण आली होती. ऋषभने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2021 मध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात गेमचेजिंग खेळी करत टीम इंडियाला जिंकून दिलं होतं. पंतच्या या खेळीमुळेच क्रिकेट चाहत्यांना त्याची आठवण आली.
दरम्यान टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनंतर विश्रांती घेत आहे. त्यानंतर काही दिवसांनी टीम इंडिया वेस्टइंडिजला रवाना होणार आहे. टीम इंडिया विंडिज दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी भारतीय संघांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.