AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravi Shastri | ‘त्याचं शरीर आता या लायक….’, टीम इंडियाच्या एका खेळाडूबद्दल रवी शास्त्री यांचं रोखठोक मत

Ravi Shastri | रवी शास्त्री यांनी हे वक्तव्य करुन टीम इंडियाच्या अनेक फॅन्सच मन मोडलय. प्रत्येक प्रश्न निर्माण होण्यामागे काही ना काही करण असतच. यामागे सुद्धा काहीतरी कारण आहेच.

Ravi Shastri | 'त्याचं शरीर आता या लायक....', टीम इंडियाच्या एका खेळाडूबद्दल रवी शास्त्री यांचं रोखठोक मत
Ravi Shastri
| Updated on: Jun 25, 2023 | 2:34 PM
Share

मुंबई : प्रसिद्धा कॉमेंटेटर आणि टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या एका खेळाडूबद्दल रोखठोक मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट फॅन्सच मन मोडलय. कारण त्यांना आपल्या आवडत्या खेळाडूकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. रवी शास्त्री हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या स्वाभावानुसार या विषयावर आपलं मत व्यक्त केलं. शास्त्री असं कसं बोलू शकतात? असं देखील काही जणांना वाटेल.

रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या T20 संघाचा कॅप्टन हार्दिक पांड्याबद्दल महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. कदाचिते ते अनेकांना आवडणार नाही.

तुम्ही विचार कराल, हे सर्व प्रश्न आताच का?

हार्दिक पांड्या आपला शेवटचा कसोटी सामना खेळलाय का? हार्दिक पांड्या पुन्हा कधी टेस्ट मॅच खेळताना दिसणार नाही का? हार्दिक पुन्हा टीम इंडियाच्या सफेद जर्सीत दिसणार नाही का? तुम्ही विचार कराल, हे सर्व प्रश्न आताच का? प्रत्येक प्रश्न निर्माण होण्यामागे काही ना काही करण असतच. यामागे सुद्धा काहीतरी कारण आहेच.

शास्त्री उगाच असं बोलणार नाहीत

हार्दिक पांड्या पुन्हा टेस्ट क्रिकेट खेळू शकत नाही, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. रवी शास्त्री बऱ्याच काळपासून टीम इंडियाशी संबंधित आहेत. त्यांनी खूप जवळून हार्दिक पांड्याची प्रगती पाहिलीय. इंजरी होण्याआधी त्याचा खेळ पाहिलाय. इंजरी नंतरही त्याचा फिटनेस पाहिलाय. आता शास्त्री जेव्हा, असं बोलतात, तेव्हा त्यात तितकच तथ्य असणार, या बद्दल अजिबात शंका नाही.

….तरच व्हाइट बॉलमध्ये कॅप्टनशिप करावी

रवी शास्त्री हार्दिक पांड्याबद्दल नेमकं काय बोलले? ते जाणून घेऊया. “यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप नंतर हार्दिक पांड्याचा फिटनेस चांगला असेल, तर त्याने व्हाइट बॉलमध्ये कॅप्टनशिपची जबाबदारी घेतली पाहिजे. टेस्ट क्रिकेट बद्दल बोलायच झाल्यास, एक गोष्ट स्पष्ट करतो की, त्याचं शरीर आता क्रिकेटच्या मोठ्या फॉर्मेटमध्ये खेळण्यालायक राहिलेलं नाही” असं शास्त्री म्हणाले.

टेस्टमध्ये कशी आहे त्याची कामगिरी?

हार्दिक पांड्या शेवटची टेस्ट मॅच सप्टेंबर 2018 मध्ये खेळला होता. म्हणजे तो मागची 5 वर्ष टेस्ट क्रिकेटपासून लांब आहे. या दरम्यान तो टी 20 आणि वनडे क्रिकेट खेळत राहिला. पण तो टेस्ट क्रिकेटमध्ये परतला नाही. जुलै 2017 मध्ये हार्दिक पांड्याने टेस्ट डेब्यु केला. सप्टेंबर 2018 पर्यंत तो 11 टेस्ट मॅच खेळला. यात त्याने 532 धावा आणि 17 विकेट काढल्यात.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.