कीरोन पोलार्डचा उत्तुंग फटका आणि कुमार संगकारा थोडक्यासाठी वाचला, काय झालं पाहा Video
इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धा सुरु असून तुफान फटकेबाजी होत आहे. ही स्पर्धा 23 जुलैला सुरु झाली असून 18 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं चांगलंच मनोरंजन होत आहे. सर्व काही व्यवस्थित सुरु असताना एक फटका आणि कुमार संगकाराच्या काळजाचा ठोका चुकला. काय झालं पाहा
इंग्लंडमध्ये द हन्ड्रेड स्पर्धेची रंगत गेल्या काही वर्षात वाढली आहे. झटपट फॉर्मेटमध्ये जगभरातील दिग्गज टी20 क्रिकेटपटू खेळत आहेत. तसेच कमी चेंडूत तुफान फटकेबाजी पाहण्याचा आनंदही क्रीडारसिकांना मिळत आहे. किरोन पोलार्डला फटकेबाजीची संधी मिळाली तर सांगायलाच नको. किरोन पोलार्डच्या साउथर्न ब्रेव या संघाने 100 चेंडूत 139 धावा केल्या आणि विजयासाठी 140 धावांचं आव्हान दिलं. पण वेल्श फायर संघ फक्त 97 धावा करू शकली. हा सामना साउथर्न ब्रेने 42 धावांनी जिंकला. या सामन्यात किरोन पोलार्डने 12 चेंडूत 17 धावा केल्या. यात त्याने दोन षटकार मारले. एक षटकार असा मारला की त्याची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे. किरोन पोलार्ड फलंदाजी करत होता तेव्हा कुमार संगकारा समालोचन करत होता. नेमकं त्याच वेळी किरोन पोलार्डने त्याच्या दिशेने चेंडू मारला. पण समालोचन करण्यात गुंग असलेल्या कुमार संगकाराला कळलं नाही आणि अचानक जागेवरून उठावं लागलं. नशिब असं होतं की चेंडू तिथपर्यंत पोहोचला नाही.
वेल्श फायरकडून पाकिस्तानी गोलंदाज हारिस रउफ गोलंदाजी करत होता. त्यावेळी चेंडू पोलार्डच्या रडारमध्ये आला आणि त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारला. कॉमेंट्री बॉक्स तिथेच सीमरेषेजवळ आहे. नशिब असं होतं की चेंडूचं अंतर थोडसं कमी पडलं आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्री बोर्डला आदळला. दरम्यान हा सामना जिंकून साउथर्न ब्रेव संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. पाच पैकी 4 सामन्यात विजय मिळवून 8 गुणांची कमाई केली आहे. तर नेट रनरेट हा +1.055 इतका आहे.
When @RDBCroft10‘s life flashed before his eyes 😵#TheHundred pic.twitter.com/trHo8UbgN3
— The Hundred (@thehundred) August 5, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11
वेल्श फायर प्लेइंग 11 : ल्यूक वेल्स ,जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर) ,जो क्लार्क ,टॉम कोहलर-कॅडमोर ,टॉम एबेल (कर्णधार) ,ग्लेन फिलिप्स, डेव्हिड विली ,डेव्हिड पायने ,मॅट हेन्री ,मेसन क्रेन ,हरिस रौफ
साउथर्न ब्रेव प्लेइंग 11 : ॲलेक्स डेव्हिस (विकेटकीपर) ,जेम्स विन्स (कर्णधार) ,लुस डु प्लॉय ,जेम्स कोल्स ,लॉरी इव्हान्स ,किरॉन पोलार्ड, ख्रिस जॉर्डन ,क्रेग ओव्हरटन ,अकेल होसेन ,डॅनी ब्रिग्स ,टायमल मिल्स