क्या बात हैं! Liam livingstone एका हाताने मारलेल्या कडक Six चा VIDEO व्हायरल
सध्या इंग्लंड मध्ये 'द हंड्रेड' स्पर्धा सुरु आहे. इंग्लिश फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने The Hundred स्पर्धेत लगावलेल्या एका जबरदस्त षटकाराची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मुंबई: सध्या इंग्लंड मध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धा सुरु आहे. इंग्लिश फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने The Hundred स्पर्धेत लगावलेल्या एका जबरदस्त षटकाराची सर्वत्र चर्चा सुरु आहे. लिव्हिंगस्टोनने डाव्याहाताने षटकार लगावला. हा सिक्स पाहून अनेकजण आश्चर्यचक्तीत झाले. ट्रेंट रॉकेट्स संघाविरुद्ध खेळताना लिव्हिंगस्टोनने हा षटकार लगावला. या षटकारासह लिव्हिंगस्टोनने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
बर्मिंघमच्या गोलंदाजीसमोर रॉकेट्स गडबडले
146 धावांच लक्ष्य बर्मिंघमने 14 चेंडू आधीच 3 विकेट गमावून पार केलं. स्फोटक फलंदाज लिव्हिंगस्टोनने पुन्हा एकदा फॅन्सना आपल्या शॉटने थक्क करुन सोडलं. पहिला गोलंदाजीचा निर्णय गेऊन बर्मिंघमने चांगली सुरुवात केली. एकवेळ 54 चेंडूत 53 धावांवर रॉकेट्सच्या 6 विकेट गेल्या होत्या. त्यानंतर लुइस आणि डेनियम सॅम्सने पार्टनरशिप केली आणि संघाला 145 धावांपर्यंत पोहोचवलं. सॅम्सने 25 चेंडूत अर्धशतक फटकावलं. लुइसने 22 चेंडूत 35 धावा केल्या.
लिव्हिंगस्टोनने मोइन अली सोबत मिळून डाव सावरला
लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या बर्मिंघमची सुरुवात इतकी चांगली झाली नाही. 21 चेंडूत 25 धावा करुन 2 महत्त्वाच्या विकेट गमावल्या. त्यानंतर कॅप्टन मोइन अली आणि लिव्हिंगस्टोनने भागीदारी केली. दोघांनी अर्धशतक फटकावलं. मोइन अली 28 चेंडूत 52 धावा करुन पॅव्हेलियन मध्ये परतला. लिव्हिंगस्टोन शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून होता. त्याने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. द हंड्रेड मध्ये बर्मिंघम 4 सामन्यात 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. रॉकेट्स संघ चौथ्या स्थानावर आहे.
One-handed six for the win and for 50? ?
Go on then, @liaml4893! #TheHundred pic.twitter.com/YslaAYodYh
— The Hundred (@thehundred) August 15, 2022
एकाच गोलंदाजाने दिले तीन झटके
लिव्हिंग स्टोन आणि मोइन अलीने जबरदस्त भागीदारी केली. दोघांनी 9 षटकारांसह 13 चौकार लगावले. दोघांमध्ये 85 धावांची भागीदारी झाली. लिव्हिंगस्टोनचा स्ट्राइक रेट 159 चा होता. त्याने आपल्या स्फोटक इनिंग मध्ये एक चौकार आणि 4 षटकार मारले. लिव्हिंगस्टोनने मॅथ्यू वेड सोबत चौथ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. बर्मिंघमच्या तिन्ही फलंदाजांना लुक वुडने पॅव्हेलियनमध्ये धाडलं.