एक जबरदस्त फटका, पण गोलंदाजाचा तितकाच अप्रतिम झेल, क्रिकेटच्या मैदानातला एक अविस्मरणीय क्षण, पहा VIDEO
इंग्लंड मध्ये सध्या 'द हंड्रेड' स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत क्रिकेटपटू कमालीच प्रदर्शन करतायत. फलंदाज आपल्या बॅटची ताकत दाखवतायत, तर गोलंदाज आपल्या भात्यातील काही अप्रतिम चेंडूंनी फलंदाजांना हैराण करतायत.
मुंबई: इंग्लंड मध्ये सध्या ‘द हंड्रेड’ स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत क्रिकेटपटू कमालीच प्रदर्शन करतायत. फलंदाज आपल्या बॅटची ताकत दाखवतायत, तर गोलंदाज आपल्या भात्यातील काही अप्रतिम चेंडूंनी फलंदाजांना हैराण करतायत. या स्पर्धेत सोमवारी ट्रेंट रॉकेट्स आणि बर्मिंघम फोनिक्स मध्ये एक सामना झाला. ज्यात एका गोलंदाजाने त्याच्या फिल्डिंगची कमाल दाखवली. या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीवर इतका अप्रतिम झेल घेतला की, पहाणारे दंग झाले.
हा सामना फोनिक्सच्या टीमने जिंकला. रॉकेट्सच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना सहाविकेट गमावून 145 धावा केल्या. फोनिक्सने हे लक्ष्य 86 चेंडूत तीन विकेट गमावून पार केलं. फोनिक्ससाठी एका गोलंदाजाने जो झेल घेतला, त्याची सर्वत्र चर्चा होतेय. या गोलंदाजाच नाव आहे, टॉम हेल्म
आपल्याच गोलंदाजी मध्ये केली कमाल
टॉमने आपल्याच गोलंदाजीवर अशी कमाल केली की, पाहणारा प्रत्येक जण दंग झाला. डावात 23 वा चेंडू टाकणाऱ्या टॉमने कॉलिन मुनरोचा विकेट घेतला. टॉमने हा चेंडू थोडा ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला होता. मुनरोने हा चेंडू आडव्या बॅटने सरळ मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू टॉम जवळ आला. चेंडू थेट टॉमच्या पायाच्या दिशेने जोरात आला. पण टॉम घाबरला नाही. त्याने डाइव्ह मारुन एक शानदार झेल घेतला. संघाला एक मोठ यश मिळवून दिलं. मुनरोने आठ चेंडूत 11 धावा केल्या. या सामन्यात टॉमने हाच एक विकेट घेतला. त्याने 20 चेंडूत 34 धावा देऊन 1 विकेट घेतला.
View this post on Instagram
मोईन अलीचा जलवा
रॉकेट्स साठी डॅनियल सॅम्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. त्याने 25 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याशिवाय कॅप्टन लुईस ग्रेगोरीने नाबाद 35 धावा केल्या. फोनिक्स हा सामना जिंकण्यात अडचण आली नाही. मोइन अलीने दमदार खेळ दाखवला. त्याला लियाम लिव्हिंगस्टोनने साथ दिली. दोघांनी अर्धशतक फटकावली. मोइन अलीने 28 चेंडूत 52 धावा चोपल्या. लिव्हिंगस्टोनने 32 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. मोइन अलीने तीन चौकार आणि पाच षटकार लगावले. लिव्हिंगस्टोनने आपल्या डावात चार षटकार आणि एक चौकार मारला. मॅथ्यू वेड 14 धावांवर नाबाद राहिला.