Rohit Sharma ने IPL मध्ये फक्त एक मॅच खेळवली, त्यानेच घातला धुमाकूळ, 40 SIX मारुन बनला नंबर 1!
मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2022 मध्ये डेब्यु करणाऱ्या संजय यादवने तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये आपल्या फलंदाजीने सगळ्यांचच मन जिंकून घेतलं आहे.
मुंबई: मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2022 मध्ये डेब्यु करणाऱ्या संजय यादवने तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये आपल्या फलंदाजीने सगळ्यांचच मन जिंकून घेतलं आहे. नेल्लाई रॉयल किंग्सच्या या खेळाडूने टुर्नामेंट मध्ये सर्वाधिक 452 धावा केल्या आहेत. त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. संजय यादवने 90 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 190 च्या जवळ होता. संजय यादवने स्पर्धेत एक शतक आणि पाच अर्धशतकं फटकावली.
संजय यादवची तुफानी फलंदाजी
संजय यादवने स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावले. त्या फलंदाजाने 40 षटकार मारले. त्याने 21 चौकार मारले. संजय यादवने चांगला खेळ दाखवला. मात्र तरीही त्यांचा संघ फायनल पर्यंत पोहोचू शकला नाही. संजय यादवने 6 विकेटही काढल्या. संजय यादवला या वर्षी आयपीएल मध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध संधी मिळाली होती. तो दुसऱ्याच चेंडूवर शुन्यावर आऊट झाला. फक्त एका सामन्याने कुठल्याही खेळाडूच्या प्रतिभेचा अंदाज लावता येत नाही. संजय यादवने टीएनपीएल मध्ये आपलं टॅलेंट सिद्ध केलं.
पावसामुळे टीएनपीएलची फायनल होऊ शकली नाही
तामिळनाडू प्रीमियर लीगची फायनल लायका कोवाई आणि चेपॉक सुपर गिलीज मध्ये होणार होती. या सामन्याला पावसाची नजर लागली. दोन्ही टीम्स संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं. प्रथम फलंदाजी करताना लायका कोवाईने 138 धावा केल्या. पावसामुळे हा सामना 17-17 षटकांचा करण्यात आला होता. चेपॉकचा संघ फलंदाजी करताना 4 ओव्हर्स झाल्या होत्या. तितक्यात पाऊस सुरु झाला. पावसाआधी चेपॉकच्या दोन विकेट गेल्या होत्या.