AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya IPL 2023 : स्वत:च्या जागेसाठी हार्दिकने त्याला टीमच्या बाहेर करुन आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड

Hardik Pandya IPL 2023 : स्वत:ला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळता यावं, यासाठी हार्दिकने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या प्लेयरला बाहेर बसवलं. हार्दिकने असं करुन, आपल्याच टीमच नुकसान केलय.

Hardik Pandya IPL 2023 : स्वत:च्या जागेसाठी हार्दिकने त्याला टीमच्या बाहेर करुन आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड
IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या त्या चुकीचा गुजरात टायटन्सला फटका, नेमकं मैदानात काय केलं? Watch VideoImage Credit source: Twitter
| Updated on: May 05, 2023 | 11:21 AM
Share

नवी दिल्ली : गुजरात टायटन्सची टीम 12 पॉइंट्ससह टॉपवर आहे. गुजरातचा परफॉर्मन्स चांगला आहे. पण हार्दिक पंड्याने 20 लाखाच्या एका प्लेयरला बाहेर बसवून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. गुजरात टायटन्सने 9 पैकी 6 मॅचेस जिंकल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने मागच्या सामन्यात गुजरातला 5 रन्सनी हरवलं. गुजरातची टीम पुनरागमन करण्यामध्ये माहीर आहे. मागच्या 4 सामन्यात टीम कॉम्बिनेशनमध्ये काहीतरी गडबड झालीय. ज्याचा टीमला फटका बसू शकतो.

मागच्या 4 सामन्यात गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये साई सुदर्शन दिसलेला नाहीय. सुरुवातीच्या 5 सामन्यात साई सुदर्शनने कमालीची बॅटिंग केली. पण मागच्या 4 मॅचसपासून तो बाहेर आहे. सुदर्शनने 5 सामन्यात 176 धावा केल्या. त्याची सरासरी 44 ची आहे. सुदर्शनला बेंचवर बसवून गुजरात टायटन्सने आपलच कॉम्बिनेशन खराब केलय.

हार्दिक आणि विजय शंकरने किती धावा केल्यात?

हार्दिकच्या सरासरीबद्दल बोलायच झाल्यास, 8 मॅचमध्ये त्याने 30.43 च्या सरासरीने 213 धावा केल्या आहेत. विजय शंकरने 7 मॅचमध्ये 41 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत.

हार्दिक पंड्याने घेतली सुदर्शनची जागा

हार्दिक पंड्याने साई सुदर्शनला बाहेर का बसवलं? हा प्रश्न मागच्या काही दिवसांपासून विचारला जातोय. सुदर्शनला बाहेर बसवून हार्दिक पंड्याने त्याची जागा घेतली आहे. हार्दिक चौथ्याऐवजी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरतोय. गुजरातसाठी विजय शंकर चौथ्या नंबरवर बॅटिंगला येतोय. गुजरातचे टॉप 4 बॅट्समन रायटी आहेत. टॉप ऑर्डरमध्ये साई सुदर्शन एकमेव लेफ्टी बॅट्समन होता. कॅप्टननेच बिघडवलं कॉम्बिनेशन

गुजरात टायटन्सकडे डेविड मिलर आणि राहुल तेवितयासारखे लेफ्टी बॅट्समन आहेत. ते मीडल आणि लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी येतात. टुर्नामेंट जसजशी पुढे जातेय, तसं गुजरातला साई सुदर्शन सारख्या फलंदाजाची गरज भासणार आहे. तिसऱ्या नंबरवर येऊन तो डाव सावरायचा. पण पंड्याने त्याला बाहेर बसवून स्वत:च्याच टीमसोबत खेळ केलाय.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.