BAN vs UAE Final | बांगलादेश आशिया किंग, यूएईचा 87 धावांवर खुर्दा
U19 Asia Cup Final 2023 Bangladesh vs United Arab Emirates Final | बांगलादेश क्रिकेट टीमने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बांगलादेशने यूएईचा 195 धावांची धुव्वा उडवत पहिल्यांदाच अंडर 19 आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे.
दुबई | बांगलादेश क्रिकेट टीमने अंडर 19 आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे. बांगलादेशने अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई टीमचा 195 धावांनी धुव्वा उडवत आशिया ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. बांगलादेशने यूएईला विजयासाठी 283 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र यूएईच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या बॉलिंगसमोर 24.5 ओव्हरमध्ये 87 धावांवर गुडघे टेकले. बांगलादेशचं या विजयानंतर सोशल मीडियावर कौतुक होत आहे.तसेच बांगलादेशच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. बांगलादेश अंडर 19 आशिया कप ट्रॉफी जिंकणारी चौथी टीम ठरली आहे. याआधी टीम इंडिया, पाकिस्तान (शेअर) आणि अफगाणिस्तान आशिया किंग ठरली आहे.
बांगलादेशच्या गोलंदाजांनी 283 धावांच्या पाठलागासाठी मैदानात आलेल्या यूएईच्या गोलंदाजांना सुरुवातीसून झटके देत बॅकफुटवर ठेवलं. यूएईला बॅकफुटवरुन मजबूत स्थितीत आणणं एकाही फलंदाजाला जमलं नाही. बांगलादेशच्या धारदार बॉलिंगसमोर यूएईच्या फलंदाजांनी पाचारण केलं. यूएईकडून फक्त दोघांनाच डबल डीजीट स्कोअर करता आला. ध्रुव पराशर याने सर्वाधिक नाबाद 25 धावा केल्या. तर अक्षत राय याने 11 धावा जोडल्या.
दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर इतर 7 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशकडून मारुफ मृधा आणि रोहनत दौल्ला बोरसन या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. मो. इक्बाल हुसेन एमोन आणि परवेझ रहमान जिबोन या दोघांनी 2-2 विकेट्स घेत यूएईला गुंडाळलं.
बांगलादेशची बॅटिंग
दरम्यान त्याआधी बांगलादेशने ओपनर आशिकार शिबली याच्या 129 धावांच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 282 धावा केल्या. शिबली व्यतिरिक्त बांगलादेशकडून चौधरी मो. रिझवान याने 60 आणि अरिफुल इस्लाम याने 50 धावा केल्या. तर कॅप्टन महफुजुर रहमान रब्बी याने 21 धावा जोडल्या. यूएईकडून अयमान अहमद याने 4 विकेट्स घेतल्या. ओमिद रहमान याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पै आणि ध्रुव पराशर या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
बांगलादेश आशिया किंग
CHAMPIONS🏆
Congratulations to Bangladesh for winning the ACC Men’s U19 Asia Cup 2023.#ACCMensU19AsiaCup #ACC pic.twitter.com/S2fwWpYvFK
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 17, 2023
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | महफुजुर रहमान रब्बी (कॅप्टन), आशिकुर रहमान शिबली (विकेटकीपर), जिशान आलम, चौधरी मो. रिझवान, अरिफुल इस्लाम, मोहम्मद शिहाब जेम्स, अहरार अमीन, परवेझ रहमान जिबोन, रोहनत दौल्ला बोरसन, मो. इक्बाल हुसेन एमोन आणि मारुफ मृधा.
यूएई प्लेईंग ईलेव्हन | अयान अफझल खान (कर्णधार), आर्यांश शर्मा (विकेटकीपर), अक्षत राय, तनिश सुरी, ध्रुव पराशर, एथन डीसूझा, यायिन राय, अम्मर बदामी, हार्दिक पै, अयमान अहमद आणि ओमिद रहमान.