U19 World Cup : टीम इंडियाचं नेपाळसमोर 297 धावांचं आव्हान, आता गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष
अंडर 19 वर्ल्डकपमधील सुपर सिक्समध्ये अंतिम सामना भारत आणि नेपाळमधये सुरु आहे. भारताने 50 षटकात 5 गडी गमवून 297 धावा केल्या आणि विजयासाठी 298 धावांचं आव्हान दिलं आहे. आता गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. सचिन धस आणि उदय सहारन यांच्या खेळीमुळे नेपाळचा संघ बॅकफूटवर गेला आहे.
मुंबई : अंडर 19 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी नेपाळविरुद्धचा विजय महत्त्वाचा आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने 50 षटकात 5 गडी गमवून 297 धावा केल्या आणि नेपाळसमोर विजयासाठी 298 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान नेपाळचा संघ पार करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. आदर्श सिंग आणि आर्शिन कुलकर्णी ही जोडी काही खास करू शकली नाही. संघाच्या 26 धावा असताना आदर्श वैयक्तिक 21 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आर्शिन आणि प्रियांशु मोलिया यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सघाच्या 61 धावा असताना प्रियांशु धावचीत झाला. त्याने 36 चेंडूत 19 धावा केल्या. त्यानंतर आर्शिनही लगेच तंबूत परतला.
टीम इंडियावर दडपण आलं असताना कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस या जोडीने चांगली फलंदाजी केली. चौथ्या गड्यासाठी 215 धावांची मजबूत भागीदारी केली. तसेच दोघांनी दमदार शतक ठोकले. सचिन धसने 101 चेंडूत 116 धावा केल्या. यात 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर उदय सहारन याने 107 चेंडूत 100 धावा केल्या. यात 9 चौकारांचा समावेश होता. मुशीर खान नाबाद 9, तर अरवेली अवनिश नाबाद 0 धावांवर राहील.
CENTURY!
That's a brilliant 💯 from Sachin Dhas 👏👏#TeamIndia 256/3 with 4 overs to go.
Follow the match ▶️ https://t.co/6Vp3LnoN6N#INDvNEP | #U19WorldCup pic.twitter.com/bURvLO9IKj
— BCCI (@BCCI) February 2, 2024
नेपाळकडून गुलसन झाने चांगली गोलंदाजी टाकली. 10 षटकात 56 धावा देत 3 गडी बाद केले. तर आकाश चंदला एक गडी बाद करण्यात यश आलं. नेपाळचं या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलं आहे. तर भारताने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरी गाठणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, सौम्य पांडे, आराध्य शुक्ला.
नेपाळ अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): अर्जुन कुमाल, दीपक बोहरा, उत्तम थापा मगर (विकेटकीपर), देव खनाल (कर्णधार), बिशाल बिक्रम केसी, दीपक डुमरे, गुलसन झा, दीपेश कंडेल, सुभाष भंडारी, आकाश चंद, दुर्गेश गुप्ता.