Urvashi rautela ने पाकिस्तानी क्रिकेटरला दिल्या बर्थ डे च्या शुभेच्छा, समोरुन आलं खूपच प्रेमळ उत्तर

RP असा उल्लेख करुन ऋषभ पंतशी पंगा सुद्धा घेतला होता. त्यांच्या भांडणाची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली. ऑगस्टमध्ये आशिया कप झाला. ही टुर्नामेंट पाहण्यासाठी उर्वशी रौतेला दुबईला गेली होती. ऋषभ पंत सुद्धा त्यावेळी टीम इंडियामध्ये होता.

Urvashi rautela ने पाकिस्तानी क्रिकेटरला दिल्या बर्थ डे च्या शुभेच्छा, समोरुन आलं खूपच प्रेमळ उत्तर
urvashi Rautela Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 12:56 PM

Urvashi rautela wishes Naseem Shah : मॉडेल-अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरील तिच्या पोस्टची अनेकदा चर्चा होते. भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतसोबत तिचं नाव जोडलं जातं. सोशल मीडियावरुन तिने RP असा उल्लेख करुन ऋषभ पंतशी पंगा सुद्धा घेतला होता. त्यांच्या भांडणाची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली. ऑगस्टमध्ये आशिया कप झाला. ही टुर्नामेंट पाहण्यासाठी उर्वशी रौतेला दुबईला गेली होती. ऋषभ पंत सुद्धा त्यावेळी टीम इंडियामध्ये होता. उर्वशी ऋषभचा पाठलाग करत दुबईला पोहोचली, असं बोललं जात होतं. खरंतर आशिया कपच्यावेळी तिचं नाव एका पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत जोडलं गेलं. दोघांमध्ये अफेअर सुरु असल्याचा अंदाजही बांधला गेला. उर्वशीच ज्या पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत नाव जोडलं गेल, त्याचं नाव आहे नसीम शाह. दोघांचे स्टेडियममधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आता 20 व्या वर्षात पदार्पण केलय

हाच नसीम शाह आता पाकिस्तानी टीमचा महत्त्वाचा सदस्य आहे. त्याने उत्तम कामगिरी करुन संघात आपल स्थान निर्माण केलय. उर्वशी रौतेलाने नुकत्यात नसीम शाहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने इन्स्टाग्रामवरुन नसीम शाहला बर्थ डे विश केलं. नसीम शाहने आता 20 व्या वर्षात पदार्पण केलय.

टॅलेंटेड वेगवान गोलंदाज

नसीम शाह टॅलेंटेड वेगवान गोलंदाज आहेच. पण त्याच बरोबर त्याची पर्सनॅलिटी सुद्धा प्रभाव पाडणारी आहे. मैदानातील त्याची कामगिरी आणि लूक यामुळे एका प्रसिद्ध कंपनीने नसीम शाहला आपलं ब्रँड अॅम्बेसिडर बनवलं आहे.

कोण मी नाही ओळखत?

टी 20 वर्ल्ड कप दरम्यान एका चाहत्याने नसीम शाह आणि उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ एडिट केला. या व्हिडिओने मीडियाच लक्ष वेधून घेतलं. उर्वशीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला. त्यावर बरीच टीका करण्यात आली. नसीम शाहला जेव्हा या व्हिडिओ बद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने कोण उर्वशी रौतेला असा उलट प्रश्न करुन तिला ओळखत नसल्याच सांगितलं. उर्वशीच्या पोस्टवर त्याने काय म्हटलं?

नसीम शाहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन टीममधील सहकारी शादाब खानला निकाहच्या शुभेच्छा दिल्या. उर्वशीने नसीमच्या त्या पोस्टवर शुभेच्छा दिल्या आहेत. उर्वशीने नसीम शाहला बर्थ डे विश करताना, बलुचिस्तान पोलीस दलात डीएसपी रँक मिळाल्याबद्दलही शुभेच्छा दिल्या आहेत. नसीम शाहने त्यावर हात जोडल्याचा इमोजी पोस्ट करत आभार मानलेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.