Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI | आपली टीम ‘ना उत्साहजनक, ना क्रूर’ प्रसिद्ध क्रिकेटपटू विंडिज विरुद्ध दुसऱ्या पराभवानंतर खवळला

IND vs WI | वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या वनडेत पराभव झाल्यानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटूने वास्तव दाखवून दिलं. वर्ल्ड कप स्पर्धा दोन महिन्यांवर आलीय. टीम इंडियाच्या कामगिरीत सुधारणा आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा निराशाच पदरी येईल.

IND vs WI | आपली टीम 'ना उत्साहजनक, ना क्रूर' प्रसिद्ध क्रिकेटपटू विंडिज विरुद्ध दुसऱ्या पराभवानंतर खवळला
Team india
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 8:53 AM

नवी दिल्ली : सध्या टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. वेस्ट इंडिजच्या टीमने 6 विकेट राखून टीम इंडियावर विजय मिळवला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना फक्त 182 धावा केल्या. वेस्ट इंडिजने हे टार्गेट 37 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाच्या या पराभवाला प्रयोग जबाबदार आहेत. टीम इंडियाकडून वनडे वर्ल्ड कपआधी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या सामन्यात खेळत नव्हते.

टीम इंडियाने या मॅचमध्ये काही प्रयोग केले होते. पण ते फसले. याआधी पहिल्या वनडेमध्ये सुद्धा असेच प्रयोग केले. पण ते सुद्धा यशस्वी ठरले नव्हते.

टीम इंडियावर जोरदार हल्लालबोल

टीम इंडियाचे प्रयोग अंगाशी आले. हेच पराभवाच मुख्य कारण आहे. माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद टीम इंडियाच्या कामगिरीवर संमाधानी नाहीयत. दुसऱ्या वनडेमधील पराभवानंतर त्यांनी टीम इंडियावर जोरदार हल्लालबोल केला आहे. त्यांनी टीम इंडियाच्या टेस्ट क्रिकेटमधील कामगिरीची दखल घेतली. पण वनडे आणि T20 मधील अपयशासाठी जोरदार टीका केली.

काय म्हणाले वेंकटेश प्रसाद?

“टेस्ट क्रिकेट बाजूला ठेवा. पण अन्य दोन फॉर्मेटमध्ये टीम इंडिया मागच्या काही काळापासून सामान्य आहे. बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज गमावली. मागच्या दोन T20 वर्ल्ड कपमध्येही कामगिरी फार चांगली नाहीय. आपली टीम इंग्लंडसारखी उत्साहवर्धक नाहीय, ना आपण ऑस्ट्रेलियासारखे क्रूर वाटतो” असं वेंकटेश प्रसाद टि्वटमध्ये म्हणाले.

कधी उमटवणार छाप?

रवी शास्त्री यांचा वारसा राहुल द्रविड पुढे नेत आहेत. त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. पण सलग दोन WTC फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मोठ यश मिळूनही मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये छाप उमटवता आलेली नाही.

दृष्टीकोन आणि प्रवृत्तीचा अभाव

“पैसा आणि ताकत आहे. पण चॅम्पियन टीम बनण्यापासून आपण दूर आहोत. प्रत्येक टीम जिंकण्यासाठी खेळते. टीम इंडियाही त्याच उद्देशाने खेळत आहे. पण दृष्टीकोन आणि प्रवृत्ती हे दोन महत्वाचे घटक असतात” असं वेंकटेश प्रसाद यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. वनडे वर्ल्ड कप दोन महिन्यावर आलाय. पण टीम इंडियाच्या कामगिरीत सुधारणा होत नाहीय. ही चिंता वाढवणारी बाब आहे. केएल राहुल सतत अपयशी ठरुनही अशीच वारंवार संधी दिली जात होती. त्यावर वेंकटेश प्रसाद यांनी अशीच बोचरी टीका केली होती.

टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान.