VIDEO : इंग्लंडच्या तरुण क्रिकेटरच्या गोलंदाजीची चर्चा, शोएब अख्तरचा विक्रम मोडला?
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा कुणी केला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचंही तुम्हाला सांगणार आहोत. तो वेग पाहून थक्का व्हाल.
नवी दिल्ली : वेगवान गोलंदाजांचा वेग नेहमीच क्रिकेट (Cricket) चाहत्यांना आकर्षित करतो. गेल्या काही महिन्यांपासून उमरान मलिकच्या (Umran malik) 150 किमी/ताशी या वेगवान गतीने भारतीय (Indian) क्रिकेट चाहत्यांना भुरळ पडली आहे. जगभरातील अनेक गोलंदाज अशा तुफानी वेगाने गोलंदाजी करतात. अद्यापपर्यंत पाकिस्तानचा (Pakistan) महान वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. पण सर्वांना आश्चर्याचा धक्का देत इंग्लंडच्या एका तरुण गोलंदाज महिलेनं आपल्या पहिल्याच सामन्यात ताशी 172 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करून सर्वांनाच चकित केले आहे. आता त्याची चर्चा तर होणारच ना, या गोलंदाजीचा व्हिडीओ देखील व्हायरल झालाय. याविषयी अधिक जाणून घ्या…
भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात असे काही घडले की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इंग्लंडसाठी या सामन्यात 21 वर्षीय वेगवान गोलंदाज लॉरेन बेलनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. लॉरेन बेलला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही, पण तिने पहिल्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर वेगाचे सर्व रेकॉर्ड मोडले. निदान टीव्हीच्या पडद्यावर तरी तेच दिसले.
हा व्हिडीओ पाहा
Lauren Bell, on her debut clocking 157kph and 165 kph as shown in the highlights. Hope this was true and not a glitch. Just brilliant.#BleedBlue#CricTracker #cricketnews#skysports #TechGlitch#indvseng #vitalityt20@ImHarmanpreet pic.twitter.com/9NptmRlMCd
— Aniket Kumar (@aniketkr07) September 11, 2022
काय वेग होता…
हे नक्कीच आश्चर्यकारक आहे. पण, तुम्ही यावर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी फक्त हे जाणून घ्या की शोएब अख्तरच्या नावावर 161.1 किलोमीटरचा सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम अजूनही कायम आहे. आता प्रश्न असा आहे की लॉरेन बेलनं काय केले, ज्याची चर्चा होत आहे? खरे तर भारतीय डावातील पहिले षटक बेलनं केले होते आणि षटकाच्या दुसऱ्या चेंडूचा बचाव भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने केला होता. आत्तापर्यंत सगळं ठीक होतं.
जोरदार गोलंदाजीचा रेकॉर्ड कायम
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. शोएब अख्तरची गोलंदाजी तुम्हाला माहिती आहे. 161.1 केएमच्या सगळ्यात जोरदार गोलंदाजीचा रेकॉर्ड कायम आहे. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूत भारतीय खेळाडू स्मृती मानधना खेळत होती. इतपर्यंत सगळं काही ठिक होतं. पण, त्यानंतर जे काही झालं. ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एक चेंडू असा आला की अनेकांनी तोंडात बोट घातलं. इतकंच नव्हे तर याच ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूच्या प्रचंड वेगानं सगळ्यांचं लक्ष वेधलं.