Suryakumar Yadav ने जिंकलं, 2 लाजवाब कॅच, सगळेच थक्क, VIDEO व्हायरल
IND vs NZ 3rd T20 : सूर्यकुमार यादव. तो रंगात आल्यानंतर बॉल कुठल्या टप्प्यावर टाकायचा? असा प्रश्न बॉलर्सना पडतो. वर्ष 2022 मध्ये त्याने आपल्या स्फोटक आणि 360 डिग्री स्टाइलने भल्या-भल्या दिग्गज बॉलर्सची झोप उडवली.
IND vs NZ 3rd T20 : T20 इंटरनॅशनलमध्ये मागच्या एक ते दीड वर्षांपासून एका खेळाडूने आपला वेगळा दबदबा निर्माण केलाय. समोरच्या बॉलरच्या मनात धडकी भरवण्यासाठी त्याचं नावच पुरेस आहे. टीम इंडियाच्या या स्टार प्लेयरच नाव आहे, सूर्यकुमार यादव. तो रंगात आल्यानंतर बॉल कुठल्या टप्प्यावर टाकायचा? असा प्रश्न बॉलर्सना पडतो. वर्ष 2022 मध्ये त्याने आपल्या स्फोटक आणि 360 डिग्री स्टाइलने भल्या-भल्या दिग्गज बॉलर्सची झोप उडवली. समोरचा बॉलर कितीही मोठा असला, तरी सूर्याने त्याचा समाचार घेतला. मैदानात नेहमीच आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवणाऱ्या सूर्यकुमारने काल आपल्या सर्वोत्कृष्ट फिल्डिंगची झलक दाखवली. लाइव्ह मॅचमध्ये सूर्याने कॅचचा Action रिप्ले दाखवला.
सूर्याची झेप
T20 मध्ये सूर्याच्या बॅटिंगची दहशत आहे. काल सूर्याच काम शुभमन गिलने केलं. सूर्या न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या T20 सामन्यात मोठी इनिंग खेळू शकला नाही. पण बॅटिंगची उणीव त्याने फिल्डिंगमध्ये भरुन काढली. न्यूझीलंडची टीम बॅटिंगसाठी मैदानात उतरल्यानंतर हार्दिक पंड्याने पहिली ओव्हर टाकली. सूर्या दुसऱ्या स्लीपमध्ये उभा होता. याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर फिन एलनची कॅच स्लीपच्या दिशेने आली. ही कॅच सोपी नव्हती.
ज्यांनी कॅच पाहिली, ते सूर्याच्या प्रेमात
चेंडू खूप वेगात आला आणि उंचावर होता. बॅटिंगमध्ये आपलं टायमिंग आणि कनेक्शनसाठी प्रसिद्ध असलेल्या सूर्याने इथे सुद्धा हेच केलं. त्याने वरच्या बाजूला डाइव्ह करत एक जबरदस्त कॅच घेतली. ज्याने कोणी सूर्याची ही कॅच पाहिली, ते सूर्याच कौतुक करतायत.
ICYMI – WHAT. A. CATCH ??#TeamIndia vice-captain @surya_14kumar takes a stunner to get Finn Allen ?#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/WvKQK8V67b
— BCCI (@BCCI) February 1, 2023
सूर्याने दाखवला Action रिप्ले
सूर्याच्या या एका कॅचने बॉलर्स आणि फिल्डर्सचा उत्साह वाढवला. सूर्याची कॅच पाहून चेंडू हातात बसला, नशिबाची साथ मिळाली, असं तुम्हाला वाटेल. पण पुन्हा काही मिनिटात सूर्याने त्याच कॅचचा Action रिप्ले दाखवला. फक्त बॅट्समन बदलला होता. त्याचं नाव होतं ग्लेन फिलिप्स. पुन्हा एकदा सूर्याने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर दुसऱ्या स्लीपमध्ये तसाच झेल पकडला. टीव्ही स्क्रीनवर सूर्याची ही कॅच पाहून विश्वास बसत नव्हता. जणू त्याने Action रिप्ले दाखवला असंच सर्वांना वाटलं. सूर्याने किती धावा केल्या?
सूर्याने या कॅचनंतर डीप मिडविकेट बाउंड्रीवर मिचेल सँटनरचा पुन्हा सुंदर झेल पकडला. सूर्या या मॅचमध्ये 13 चेंडूत 24 धावांची छोटी पण महत्त्वाची इनिंग खेळला. सूर्याच्या या योगदानामुळे टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध 234 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडला हा टार्गेट पेलवलं नाही. त्यांची टीम फक्त 66 रन्समध्ये ऑलआऊट झाली. टीम इंडियाने 168 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.