लंडनच्या रस्त्यावर Sourav Ganguly चा डान्स, व्हिडिओ व्हायरल
बीसीसीआयचा अध्यक्ष (BCCI President) आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) काल 8 जुलैला आपला 50 वा वाढदिवस साजरा केला.
मुंबई: बीसीसीआयचा अध्यक्ष (BCCI President) आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) काल 8 जुलैला आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. सौरव गांगुलीची भारताच्या आक्रमक कर्णधारांमध्ये गणना होते. सौरव गांगुलीने आपला 50 वा वाढदिवस खास मित्र आणि कुटुंबीयांसमवेत लंडनमध्ये (London) साजरा केला. फॅन्सना यावेळी दादा मधला डान्सर दिसला. सोशल मीडियावर गांगुलीच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय. लंडनच्या रस्त्यावर तो नाचताना दिसतोय. सौरव सोबत त्याचे कुटुंबीयही आहेत.
मुलीसोबत सौरव गांगुलीचा डान्स
गांगुलीचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यात पत्नी डोना आणि मुलगी सना सुद्धा त्याच्यासोबत डान्स करताना दिसतेय. लंडनमधला हा व्हिडिओ आहे. बॉलिवूड गाण्यावर सौरवने ठोका धरला होता. शाहरुख खानच्या ‘बस दिवानगी, दीवानगी हैं’ गाण्यावर डान्स केला. अक्षय कुमारच्या ‘तू मेरा हिरो’ गाण्यावर सौरवने मुलगी सनासोबत डान्स केला. तिथे उपस्थित असलेला मित्र परिवारही गांगुली सोबत डान्स करत होता. गांगुलीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. ते हा व्हिडिओ शेयर करतायत.
Sourav Ganguly dances on SRK starrer ‘Om Shanti Om’ song near London Eye on his 50th birthday.#SouravGangulybirthday #SouravGanguly #London #Dada #Dada50thBirthday pic.twitter.com/UAI8KLOgMc
— Tirthankar Das (@tirthajourno) July 8, 2022
गांगुलीच्या केक कटिंगचा व्हिडिओ व्हायरल
गांगुलीच्या केक कटिंगचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. व्हिडिओत गांगुली 50 व्य़ा वाढदिवसाचा केक कापताना दिसतोय. पत्नी डोना आणि मुलगी सना सुद्धा सोबत दिसतेय. गांगुलीने मुलगी सनासोबत वायलनच्या धुनवर सुद्धा डान्स केला. याआधी सौरवने आपला मित्र आणि सलामीवीर सचिन तेंडुलकरसोबत प्री बर्थ डे पार्टी सेलिब्रेट केली. सचिनशिवाय बीसीसीआयचे अधिकारी सुद्धा या पार्टीमध्ये दिसले होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव जय शाह सुद्धा गांगुलीसोबत होते. राजीव शुक्ला यांनी स्वत: टि्वटरवर प्री-बर्थ डे पार्टीचे फोटो पोस्ट केलेत.