Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकरच्या समर्थनासाठी धावून आला सचिनचा कट्टर मित्र, म्हणाला…..

अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं.

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकरच्या समर्थनासाठी धावून आला सचिनचा कट्टर मित्र, म्हणाला.....
अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं.
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 6:39 PM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी काही दिवसांपूर्वी लिलाव प्रक्रिया (IPL Auction 2021) पार पडली. या लिलावातून मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) 20 लाखांच्या बेस प्राईजवर आपल्या ताफ्यात घेतलं. यानंतर अर्जुनवरुन सोशल मीडियावर घराणेशाहीच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा रंगली. तसेच अर्जुनला नेटीझन्सच्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर सचिनचा कट्टर मित्र आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) अर्जुनच्या समर्थनासाठी धावून आला आहे. विनोदने अर्जुनचे समर्थन केलं आहे. तसेच अर्जुनला खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, असे आवाहन विनोद कांबळीने केलं आहे. (Vinod Kambli appeals to fans said Encourage Arjun Tendulkar to play)

विनोदी कांबळी काय म्हणाला?

कांबळीने अर्जुनसोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. “अर्जुनचे क्रिकेटप्रति असलेले प्रेम आणि निष्ठा मी पाहिली आहे. मुंबई प्रीमियर लीग दरम्यान आम्ही दोघे क्रिकेटबाबतीत फार चर्चा करायचो. अर्जुनची खेळाप्रती फार निष्ठा आहे. अर्जुनने क्रिकेटमध्ये नुकतीच सुरुवात केली आहे. इतर कोणत्याही युवा खेळाडूप्रमाणे आपण अर्जुनला चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करुयात, असं आवाहन कांबळीने क्रिकेट चाहत्यांना ट्विद्वारे केलं आहे.

झहीर अर्जुनबाबत काय म्हणाला होता?

“अर्जुन खूप मेहनती आहे. त्याला बरेच काही शिकायचे आहे. अर्जुन सचिनचा मुलगा असल्याचा दबाव त्याच्यावर नेहमीच असणार आहे. त्याला या दबावाबरोबरच रहावे लागेल. अर्जुन टीम बरोबर असण्याची ही काही पहिली वेळ नाही. आयपीएल 2020 च्या आधी तो नेट बॉलर म्हणून संघासह युएईमध्ये गेला होता”, असं मुंबई इंडियन्सचा बोलिंग कोच झहीर खान म्हणाला होता.

आकाश चोप्रा काय म्हणाला होता?

” अर्जुन मुंबईच्या टीमसोबत राहून बरेच काही शिकू शकतो. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे त्याचे वडिल आहेत. सचिन क्रिकेटचं विद्यापीठ आहे. अर्जुनला आपल्या वडीलांकडून खूप काही शिकता येऊ शकतं. अर्जुन आता सर्वात यशस्वी फ्रँचायजीशी जोडला गेला आहे. मुंबईच्या गोटात अर्जुनला क्रिकेटबाबतीत सर्व छक्के पंजे शिकता येतील. अर्जुनने मुंबईसाठी विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुन फक्त त्याच्या आडनावामुळे इथवर पोहचलेला नाही. तो काही न काही करत असतो. मुंबईला अर्जुन हवा होता, त्यामुळे मुंबई फ्रँचायजीने खरेदी केलं आहे”, असं टीम इंडियाचा माजी खेळाडू राहिलेला आकाश चोप्रा म्हणाला होता.

मुंबई आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 13 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईकडून यावेळेसही विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करणार का, याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

आयपीएल 2021 साठी टीम मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, आदित्‍य तरे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, ट्रेन्ट बोल्‍ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, ख्रिस लिन, राहुल चाहर, हार्दिक पांड्या, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, अनुकूल रॉय, इशान किशन, नॅथन कुल्टर नाइल, पीयूष चावला, युद्धवीर चरक, मार्को जॅनसन, अर्जुन तेंडुलकर आणि जेमी निशाम.

संबंधित बातम्या :

Aakash Chopra | ….म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, नेटकऱ्यांकडून जोरदार टीका

(Vinod Kambli appeals to fans said Encourage Arjun Tendulkar to play)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.