Vinod Kambli : विनोद कांबळी पुन्हा अडचणीत, पत्नीने केला गंभीर आरोप

Vinod Kambli : विनोद कांबळीच प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा तो वादात अडकला आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे.

Vinod Kambli : विनोद कांबळी पुन्हा अडचणीत, पत्नीने केला गंभीर आरोप
Vinod kambli
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 9:57 AM

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. यावेळी त्याच्यावर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे. विनोद कांबळी विरोधात पत्नीनेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. विनोद कांबळीने दारु पिऊन शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप पत्नीने केलाय. विनोद कांबळीच प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा तो वादात अडकला आहे. वांद्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी विरोधात IPC च्या कलम 324 आणि 504 अंतर्गत FIR नोंदवण्यात आलाय. बायकोवर कुकिंग पॅन फेकून मारल्याचा आरोप आहे. यात पत्नीच्या डोक्याला गंभीर मार लागलाय.

12 वर्षांचा मुलगा साक्षीदार

रात्री 1 ते 1.30 दरम्यान कांबळी आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. बायकोला त्याने मारझोड केली. कांबळी दारुच्या नशेत वांद्रयातील आपल्या फ्लॅटवर आला. नशेच्या धुंदीत त्याने पत्नीला शिव्या दिल्या. कांबळी आणि त्याच्या पत्नीमध्ये झालेल्या वादाचा साक्षीदार त्यांचा 12 वर्षांचा मुलगा आहे. दारुच्या नशेत आपले वडिल काय करतायत, हे तो सर्व पहात होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

कांबळी किचनमध्ये गेला आणि….

भांडण फक्त शिवागाळीपुरता मर्यादीत राहिलं नाही. कांबळी किचनमध्ये गेला, त्याने कुकिंग पॅन उचललं आणि पत्नीच्या डोक्यावर फेकून मारलं. विनोद कांबळी विरोधात तक्रार नोंदवण्याआधी त्याच्या बायकोने भाभा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले, असं पोलिसांनी सांगितलं.

FIR मध्ये काय आहे?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेनंतर विनोद कांबळीचा मोबइल स्वीच ऑफ येतोय. पत्नीने नोंदवलेल्या FIR मध्ये म्हटलं आहे की, “विनोद आपल्याला घाबरवतो. मला आणि मुलांना शिवीगाळ करतो. इतकचं नाही, त्यांना मारतो सुद्धा. कुकिंग पॅन फेकून मारल्यानंतर त्याने मला बॅटने सुद्धा मारहाण केली”

कांबळी किती वनडे आणि टेस्ट खेळलाय?

1990 च्या दशकात विनोद कांबळी भारतीय संघाचा सदस्य होता. तो बराच काळ टीमचा भाग होता. त्याने 17 कसोटी आणि 104 वनडे सामने भारतासाठी खेळले आहेत. यात 3500 पेक्षा जास्त धावा केल्या. आधी सुद्धा वादात अडकलाय कांबळी

दारुच्या नशेत वाद घालण्याची विनोद कांबळीची पहिली वेळ नाहीय. यावेळी पत्नी त्याच्याविरोधात गेलीय. मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यावेळी त्याने दारुच्या नशेत आपल्या गाडीने धडक दिली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.