Virat Kohli 100th Test: विराटसाठी आता नाही, तर पुन्हा कधीच नाही, मोहालीच्या 100 व्या टेस्टचं 71 नंबरशी खास कनेक्शन
उद्यापासून मोहालीमध्ये (Mohali Test) श्रीलंकेविरुद्ध (India vs Srilanka) सुरु होणारा पहिला कसोटी सामना टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खास आहे.
चंदीगड: उद्यापासून मोहालीमध्ये (Mohali Test) श्रीलंकेविरुद्ध (India vs Srilanka) सुरु होणारा पहिला कसोटी सामना टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खास आहे. विराट कोहलीचा (Virat kohli) 100 वा कसोटी सामना हा भारतीय क्रिकेटसाठीही खास क्षण असणार आहे. सध्याचा भारतीय क्रिकेटमधला एका मोठा स्टार आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. विराट कोहलीसाठी हा क्षण ऐतिहासिक बनवण्यासाठी बीसीसीआयने खास तयारी केली आहे. स्वत: विराट कोहली सुद्धा या सामन्यात इतिहास रचू शकतो. सर्वांनाच विराट कोहलीच्या 71 व्या शतकाची प्रतिक्षा आहे. विराट कोहलीसाठी 71 नंबर मोहालीमध्ये कमाल करु शकतो. जाणून घ्या काय आहे कनेक्शन. विराट कोहलीच्या फलंदाजीकडे उद्या सगळ्यांच्या नजरा असतील.
- विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 70 शतकं झळकावली आहेत. यात 43 शतकं वनडेमध्ये तर 27 शतकं कसोटीमध्ये झळकावली आहेत. विराट कोहलीला मागच्या अडीच वर्षापासून आपल्या 71 व्या शतकाची प्रतिक्षा आहे.
- विराटने आपलं शेवटचं शतक 22 नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. बांगलादेशविरुद्ध कोलकात्यामध्ये खेळल्या गेलेल्या डे-नाइट कसोटी सामन्यात विराटने हे शतक झळकावलं होतं. तेव्हापासून विराटने आतापर्यंत 70 डावात फलंदाजी केली आहे. यात टेस्ट, वनडे आणि टी 20 मधील सर्व सामने आहेत. त्यामुळे विराट मोहालीमध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरेल, ती त्याची 71 वी इनिंग असेल.
- उद्या विराटचा 100 कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश होईल. विशेष म्हणजे 100 वी कसोटी खेळणारा विराट 71 वा खेळाडू आहे. इंग्लंडच्या 15 क्रिकेटपटूंनी आपल्या देशासाठी 100 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत.
- त्यामुळे उद्या 71 नंबर विराटसाठी फायद्याचा ठरू शकतो. त्याला मोहालीत एक नवीन इतिहास रचण्याची संधी आहे. आतापर्यंत कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूने आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात शतक झळकावलेले नाही. जागतिक क्रिकेटमध्ये असे फक्त नऊच खेळाडू आहेत, ज्यांनी 100 व्या कसोटीत शतक झळकावलं आहे.
- सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्ही एस लक्ष्मण, अनिल कुंबळे, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, इशांत शर्मा, हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग हे खेळाडूच भारतासाठी 100 कसोटी सामने खेळले आहेत.
virat kohli 100th test match waiting for 71st century mohali india vs srilanka test
Non Stop LIVE Update