VIDEO : विराट कोहली-बाबर आझम आमनेसामने, मैदानावर समोरासमोर पाहून बाबर स्वतःला रोखू शकला नाही, पाहा व्हिडीओ

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ 28 ऑगस्टला एकमेकांविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. मात्र, त्याआधी बुधवारी विराट कोहली आणि बाबर आझम हे दोन्ही खेळाडू मैदानावर आमनेसामने आले.

VIDEO : विराट कोहली-बाबर आझम आमनेसामने, मैदानावर समोरासमोर पाहून बाबर स्वतःला रोखू शकला नाही, पाहा व्हिडीओ
विराट कोहली-बाबर आझम आमनेसामनेImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 7:18 AM

नवी दिल्ली : आशिया कपमध्ये 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तानचा संघ आमनेसामने येणार आहे. प्रत्येकजण या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहे. दोन्ही संघ युएईलाही पोहोचले आहेत. भारत (Team India) आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनीही सराव सुरू केला आहे. याचा एक व्हिडीओ बीसीसीआयनं (BCCI) सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. जिथे दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भेटताना दिसले. विशेषतः बाबर आझम आणि विराट कोहली. दोन्ही स्टार्सचे फोटोही सगळ्यांनाच आवडतात. भारत-पाकिस्तान सामन्यात सर्वांच्या नजरा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यावर खिळल्या आहेत. अनेकदा दोन्ही खेळाडूंची तुलना होते. कोहली सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. दुसरीकडे बाबर सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. बुधवारी दोन्ही संघांनी मैदानावर जोरदार सराव केला. सराव सत्रात कोहली आणि बाबर यांची भेट झाली. भारतीय स्टारला पाहून पाकिस्तानी कर्णधार स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याची प्रेमळ भेट घेतली. दोन्ही खेळाडूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बीबीसीचं ट्विट

बरोबरी करण्यासाठी मैदानात

गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ प्रथमच आमनेसामने जात आहे. त्यावेळी भारतीय संघाची कमान विराट कोहलीच्या हाती होती. मात्र, यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार असून, मागील पराभवाचा हिशोब बरोबरी करण्यावर संघाचा प्रयत्न आहे. सराव सत्रादरम्यान दोघेही काही वेळ बोलले.

अफगाण संघासोबत वेळ घालवला

भारतीय खेळाडूंनी अफगाणिस्तान संघाचीही भेट घेतली. युझवेंद्र चहल, हार्दिक पंड्या यांनी रशीद खानसह अफगाणिस्तानच्या खेळाडूंसोबत बराच वेळ घालवला. यादरम्यान व्हीव्हीएस लक्ष्मणही राहुल द्रविडची जबाबदारी सांभाळताना दिसला. वास्तविक राहुल द्रविडला कोरोनाचा फटका बसला असून तो संघासह यूएईला जाऊ शकला नाही. व्हीव्हीएस लक्ष्मण यांना अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच द्रविड संघात सामील होईल.

28 ऑगस्टला सामना

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ 28 ऑगस्टला एकमेकांविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. मात्र, त्याआधी बुधवारी विराट कोहली आणि बाबर आझम हे दोन्ही खेळाडू मैदानावर आमनेसामने आले. दरम्यान, येत्या सामन्यात काय होतं, याकडे देखील लक्ष लागून आहे. विराटची कामगिरी आयपीएलमध्ये फारशी चांगली नव्हती. त्यावेळी त्याच्यावर चाहत्यांनी रोषही व्यक्त केला होता. आता आशिया चषकात काय होतं, ते पाहणं महत्वाचं ठरेल.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.