Virat Kohli Century In World Cup 2023 | विराट कोहली याचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम उध्वस्त
virat kohli century in ind vs NZ world cup 2023 | विराट कोहली याने क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला मागे टाकत इतिहास रचला आहे. रनमशीन विराटने सचिनचा सर्वाधिक वनडे सेंच्युरीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने न्यूझीलंड विरुद्ध इतिहास रचला आहे. विराटने न्यूझीलंड विरुद्ध खणखणीत शतक ठोकलं आहे. विराटचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील 50 वं शतक ठरलं आहे. विराटने या शतकासह विश्व विक्रम केला आहे. विराटने सचिन तेंडुलकर याचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विश्व विक्रम मोडीत काढला आहे. विराटच्या नावावर आता सर्वाधिक शतकांचा विश्व विक्रम झाला आहे.
विराट कोहली याने 106 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. विराटने या शतकी खेळीदरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली. विराटने संधी मिळेल तेव्हा न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वरचढ झाला. मात्र विराटला 80 धावानंतर थोडा संघर्ष करावा लागला. विराटला धावताना त्रास जाणवत होता. मात्र त्यानंतरही विराटने एक-दोन धावा घेत शतकाच्या दिशेने वाटचाल सुरुच ठेवली. मात्र विराटने 42 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर विराटने 2 धावा घेत ऐतिहासिक शतक पूर्ण केलं.
सचिनकडून कौतुक विराट नतमस्तक
विराटने शतक पूर्ण केल्यानंतर पत्नी अनुष्काने स्टँडमध्ये एकच जल्लोष केला. तर सचिन तेंडुलकर यानेही विराटचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. तर विराट सचिनसमोर नतमस्तक झाला. विराटचं या ऐतिहासिक शतकानंतर सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. विराटला सोशल मीडियावर चहुबाजूने शुभेच्छा दिल्या जात आहेत.
विराटने शतक पूर्ण केल्यानंतर आक्रमक रुप धारण केलं. विराटने काही फटके मारले. मात्र त्यानंतर विराट आऊट झाला. विराटला या शतकी खेळीची मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यात अपयश आलं. विराटला टीम साऊथीने आपल्या बॉलिंगवर डेव्हॉन कॉनव्हे याच्या हाती कॅचआऊट केलं. विराटने 113 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 117 धावांची खेळी केली.
‘विराट’ शतक
𝗙𝗜𝗙𝗧𝗬 𝗢𝗗𝗜 𝗛𝗨𝗡𝗗𝗥𝗘𝗗𝗦! 💯
A round of applause for the run-machine: VIRAT KOHLI 👏👏#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/EbLta2kjue
— BCCI (@BCCI) November 15, 2023
वेगवान 50 वं एकदिवसीय शतक
दरम्यान विराटने केवळ सचिनचा रेकॉर्ड ब्रेकच केला नाही, तर वेगवान 50 शतकं पूर्ण केली. सचिनने 50 एकदिवसीय शतकं ही 452 डावात पूर्ण केली होती. तर विराटने 50 शतकं 279 डावातच केली.
न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन | केन विल्यमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.
टीम इंडिया प्लेईग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.