Virat Kohli : डोळ्यासमोर 100 शतकं, विराट सचिन सारखं वयाच्या 40 पर्यंत खेळू शकतो का?
Virat Kohli : तुम्हाला काय वाटतं? विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणं जमेल का? विराटकडे अजून किती वर्षांच क्रिकेट शिल्लक आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्या.
Virat Kohli Test Century : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने आज कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. मागच्या 3 वर्षांपासून भारतीय क्रिकेटप्रेमी विराट कोहलीच्या टेस्ट शतकाच्या प्रतिक्षेत होते. विराटने आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झुंजार शतक झळकावलं. विराट कोहलीने त्याच्या शतकी खेळीत फक्त 5 चौकार मारले होते. विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये शेवटच शतक बांग्लादेश विरुद्ध 2019 मध्ये ठोकलं होतं.
त्यानंतर आज विराटने शतकी खेळी साकारली. विराटच कसोटी क्रिकेटमधील हे 28 व करिअरमधील 75 व शतक आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. विराटने हे शतक खूप महत्त्वाच्या सामन्यात झळकावलं.
किती चेंडूत विराटने सेंच्युरी झळकवली?
टीम अडचणीत असताना विराटच्या बॅटमधून हे शतक निघाल्याने त्याचं मोल खूप मोठं आहे. विराटने 241 चेंडूचा सामना करत शतकी खेळी साकारली. भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर फक्त आता विराट कोहलीच्या पुढे आहे. सचिनच्या नावावर 100 सेंच्युरीचा रेकॉर्ड आहे.
सचिनचा 100 सेंच्युरीचा रेकॉर्ड विराट मोडेल ?
विराटने कोहलीने क्रिकेट करिअरमधील 75 व शतक झळकवल्यानंतर तो सचिन तेंडुलकरचा 100 सेंच्युरीचा विक्रम मोडणार का? ही चर्चा पुन्हा एकदा सुरु झालीय. विराट मागची दोन वर्ष खराब फॉर्ममध्ये होता. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आशिया चषक टी 20 टुर्नामेंटपासून त्याला सूर गवसला. आधी टी 20 त्यानंतर वनडे आणि आता कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ विराट कोहलीने संपवला.
CENTURY for @imVkohli ??
He’s battled the heat out here and comes on top with a fine ?, his 28th in Test cricket. #INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/i1nRm6syqc
— BCCI (@BCCI) March 12, 2023
सचिन रेकॉर्ड मोडायला विराटला किती वर्ष लागतील?
सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांचा विचार केल्यास विराट कोहलीला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी अजून 5 ते 6 वर्ष लागतील. सध्याच्या घडीला वय आणि फिटनेस दोन्ही विराटच्या बाजूने आहे. विराट सध्या 34 वर्षांचा आहे. सचिन वयाच्या 40 व्या वर्षी 206 दिवसांचा असता शेवटचा कसोटी सामना खेळला होता. जास्त काळ क्रिकेट खेळण्यासाठी विराटला काय कराव लागेल?
विराटचा सध्याचा फिटनेस लक्षात घेता, तो आरामात वयाच्या चाळीशीपर्यंत खेळू शकतो. विराट यापुढे टीम इंडियाच्या टी 20 संघात दिसेल असं वाटत नाही. आयपीएलमध्ये नक्कीच खेळेल. पण टी 20 क्रिकेट कमी करुन वनडे, टेस्टवर लक्ष केंद्रीत केल्यास विराटसाठी हे लक्ष्य कठीण नाहीय.