AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विराट’ नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारा खास व्यक्ती काळाच्या पडद्याआड!

विराटचे बालपणीचे बॅटिंग प्रशिक्षक सुरेश बत्रा यांचं निधन झालंय. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी बत्रा यांच्या निधनाची माहिती दिलीय. (Virat Kohli Childhood Coach Suresh Batra passes away)

'विराट' नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारा खास व्यक्ती काळाच्या पडद्याआड!
विराटचे बालपणीचे बॅटिंग प्रशिक्षक सुरेश बत्रा यांचं निधन झालंय.
| Updated on: May 22, 2021 | 3:16 PM
Share

मुंबई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड (India Tour of England) दौऱ्यावर जातोय. येत्या 2 जूनला इंग्लंडला रवाना होण्यासाठी भारतीय संघ टेक ऑफ करेल. पण इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी दु:खद बातमी आहे. विराटचे बालपणीचे बॅटिंग प्रशिक्षक सुरेश बत्रा यांचं निधन झालंय. 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी बत्रा यांच्या निधनाची माहिती दिलीय. (Virat Kohli Childhood Coach Suresh Batra passes away)

विजय यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “विराट कोहलीला ज्यांनी लहाणपणी बॅटिंगची तंत्र शिकवली त्या सुरेश बत्रा यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतलाय. गुरुवारी सकाळी पूजा करताना ते अचानक कोसळले. ज्यानंतर त्यांना शुद्ध आलीच नाही. त्यांनी त्याच जागी अखेरचा श्वास घेतला”

‘विराट’ नावाच्या हिऱ्याला पैलू पाडले…!

विराट कोहलीने कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्याकडून वेस्ट दिल्ली क्रिकेट अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं. सुरेश बत्रा याच अॅकॅडमीमध्ये सहाय्यक प्रशिक्षक होते. राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा यांनी कोहलीची बॅटिंग तंत्र सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

विराट कोहलीने कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्याकडून वेस्ट दिल्ली क्रिकेट अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं. सुरेश बत्रा याच अॅकॅडमीमध्ये सहाय्यक प्रशिक्षक होते. राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा यांनी कोहलीची बॅटिंग तंत्र सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

विराट कोहलीने राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या 9 व्या वर्षापासून क्रिकेटचे धडे गिरवले. बत्रा यांनी कोहलीशिवाय अन्य क्रिकेटर्सला देखील क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं. यामध्ये अंडर 19 वर्ल्ड कप दणदणीत शतक ठोकणारा डावखुरा फलंदाज मनजोत कालराचा समावेश आहे. 2018 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा कालरा एक भाग होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरोधात फायनल सामन्यात दणदणीत शतक ठोकलं होतं.

विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी

दिल्लीतून आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीची गणना सध्या जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंमध्ये होते. त्याने 2008 साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. विराटने आतापर्यंत 91 कसोटी सामने, 254 एकदिवसीय सामने तर 90 टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत 7 हजार 490, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 हजार 169 तर टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये 3 हजार 159 रन्स केले.

भारताचा इंग्लंड दौरा

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाचं विराट कोहली नेतृत्व करतोय. इंग्लंड दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्ध WTC चा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची मालिका भारताला खेळायची आहे.

(Virat Kohli Childhood Coach Suresh Batra passes away)

हे ही वाचा :

टायगर अभी जिंदा है, 45 वर्षीय बॅट्समनचं वादळ, 15 चौकार-15 षटकार, इंझावाती 190 धावा

माँटी पनेसारची भविष्यवाणी, इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत ‘हा’ संघ 5-0 ने जिंकेल!

IPL स्थगित झाली नसती तर मीच स्पर्धा सोडली असती, चहलच्या तडकाफडकी निर्णयामागचं ‘इमोशनल’ कारण

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.