Video: हजारो कोटींची संपत्ती असलेल्या विराट कोहलीच्या वाटेला असं दु:ख, म्हणाला; ‘स्वातंत्र्य मिळालं तर…’
IPL 2023 : विराट कोहलीकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्याला कसल्याच गोष्टीची कमी नाही. मानसन्मानसह चाहत्यांचा गरडा त्याला असतो. पण असं असूनही त्याची एक इच्छा अपूर्णच राहिली आहे.
मुंबई : विराट कोहली हे क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे. त्याने आपल्या कामगिरीने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय क्रीडापटूच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. यावरूनच त्याची लोकप्रियता अधोरेखित होते. एखादी पोस्ट, जाहीरात आणि इतर ठिकाणांवरून त्याला खोऱ्याने पैसा मिळतो. पण इतकं असूनही त्याला एका गोष्टीची उणीव भासत आहे. कारण पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही. असंच काहीसं म्हणणं विराट कोहलीचं आहे. आयपीएल 2023 दरम्याने त्याने आपलं दु:ख बोलून दाखवलं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यापूर्वी त्याने स्टार स्पोर्ट्सच्या शो मध्ये आपलं दु:ख बोलून दाखवलं. त्याला विचारलेल्या एका प्रश्नावर त्याने दिलेलं उत्तर खरंच डोळ्यात अंजन घालणारं होतं. विराटो कोहलीला विचारलं की, 12 तासांचं स्वातंत्र्य मिळालं तर काय करशील?
विराट कोहलीने सांगितलं की, “जर खरंच असं स्वातंत्र्य मिळालं तर मी गाडी किंवा स्कुटीवर फिरणार नाही.मी फक्त चालणं पसंत करेन. कारण मी कित्येक वर्षे पायी चाललोच नाही. मी लहानपणी कायम लोकल मार्केटमध्ये जायचो. साईडला स्कुटी लावून मार्केटमध्ये फिरून खरेदी करायचो.”
Can you guess what @imVkohli would do, if he was given 12 hours of freedom in India? ?
His answer gives us all the feels. ?
Tune-in to #RCBvDC at #IPLonStarToday | Pre-show at 2:30 PM & LIVE action at 3:30 PM | Star Sports Network#GameOn #BetterTogether pic.twitter.com/jacW7bHVBn
— Star Sports (@StarSportsIndia) April 15, 2023
“लोकल मार्केटमधून जीन्स, घड्याळ या वस्तू खरेदी करायचो. या गोष्टी मी मिस करत आहे. जर मला पुन्हा तशी वेळ मिळाली तर मी रस्त्यावर दिलखुलासपणे फिरेल. पायी फिरण्याची मजाच काही और आहे. जिथे खायची इच्छा होईल तिथे खाईन. काही विकत घ्यायचे घ्यायचं. असं करून खूप काळ लोटला आहे.”, असंही विराट कोहलीने पुढे सांगितलं.
आयपीएल 2023 स्पर्धेत विराट कोहली चांगल्याच फॉर्मात आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. चार सामन्यात 71.33 च्या सरासरीने 214 धावा केल्या. आतापर्यंत विराट कोहलीने 3 अर्धशतकं झळकावली आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंत स्पर्धेत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यापासून एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. त्यात दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं आहे. त्यामुळे यंदा तरी जेतेपदावर नाव कोरणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत.
बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.