Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs PBKS IPL 2022: OUT झाल्यानंतर Virat Kohli आकाशाकडे पाहून काय बडबडला?, पहा VIDEO

RCB vs PBKS IPL 2022: आजही विराट खेळपट्टीवर ठाण मांडण्याच्या इराद्याने आला होता. पण नशिबाची साथ त्याला लाभली नाही. मागच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली जगदीश सुचिताच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

RCB vs PBKS IPL 2022: OUT झाल्यानंतर Virat Kohli आकाशाकडे पाहून काय बडबडला?, पहा VIDEO
virat kohli Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 11:07 PM

मुंबई: विराट कोहलीची (Virat kohli) महान क्रिकेटपटूंमध्ये गणना होते. पण सध्या याच विराटचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे. अजूनही त्याचा बॅड पॅच संपलेला नाही. विराट कोहलीला भारताची रन मशीन म्हटलं जायचं. पण तोच विराट आता डक मशीन (Duck machine) झाल्याची टीका होते. सर्वकालिन महान क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते. पण सध्या विराट धावांसाठी झगडतोय. विराट आपल्या बाजूने सर्व प्रयत्न करतोय. पण नशिबाची साथ त्याला मिळत नाहीय. आयपीएलच्या या सीजनमध्ये विराटने फक्त एक अर्धशतक झळकावलय. 2016 मध्ये विराट कोहली करीयरच्या शिखरावर होता, तेव्हा त्याने आयपीएलच्या (IPL) एका सीजनमध्ये 1000 धावा फटकावल्या होत्या. पण या सीजनमध्ये धावा जणू त्याच्या बॅटमधून आटल्या आहेत. विराट आधीच या सीजनमध्ये तीन गोल्डन डक म्हणजे शुन्यावर आऊट झालाय.

DRS मुळे विराट बाद

आजही विराट खेळपट्टीवर ठाण मांडण्याच्या इराद्याने आला होता. पण नशिबाची साथ त्याला लाभली नाही. मागच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली जगदीश सुचिताच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. डावातील पहिल्याच चेंडूवर शुन्यावर विराट आऊट झाला होता. आजच्या पंजाब विरुद्धच्या सामन्यात विराटने चांगली सुरुवात केली होती. त्याने दोन चौकार आणि एक षटकारासह 14 चेंडूत 20 धावा फटकावल्या होत्या. पण राबाडाच्या एका चेंडूने त्याचा घात केला. राहुल चाहरने त्याचा झेल घेतला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट बाद असल्याच अपील झालं. पंजाब किंग्सने DRS चा आधार घेतला. रिप्लेमध्ये बॉल विराटच्या ग्लोव्हजचा चाटून गेल्याच दिसलं.

विराटला विश्रांती देणार?

शॉर्ट फाइन लेगला उभ्या असलेल्या चाहरने त्याचा झेल पकडला. विराट बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना, त्याने आकाशाकडे बघितलं व तोंडात काही शब्द पुटपुटला. विराट नेमकं त्यावेळी काय बोलला हे समजू शकत नाही. पण अशा पद्धतीने आऊट झाल्यामुळे तो निराश, अस्वस्थ दिसला. विराट लवकर बाद झाला, तर त्याची खूप उलट-सुलट चर्चा होते. विराट कोहलीला आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी विश्रांती मिळू शकते.

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.