Video : कोहली का बल्ला, माशाअल्लाह! रनमशीन पुन्हा फॉर्ममध्ये, हॉंगकाँगविरुद्ध किंग कोहलीचं शानदार अर्धशतक

9.6च्या रन रेटने भारताने 20 ओव्हरमध्ये 192 धावा केल्या. यात 8 अतिरीक्त धावा हाँगकाँगच्या गोलदांजांनी टाकलेल्या वाईक आणि बाईजमुळे मिळाल्या. तर अन्य सगळ्या धावा या भारतील फलंदाजांनी केल्या.

Video : कोहली का बल्ला, माशाअल्लाह! रनमशीन पुन्हा फॉर्ममध्ये, हॉंगकाँगविरुद्ध किंग कोहलीचं शानदार अर्धशतक
विराट कोहलीImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 9:48 PM

दुबई : विराट कोहली (Virat Kohli). भारताचा गेल्या काही वर्षातला नंबर वन फलंदाज.  टी-20 च्या आपल्या मॅच नंबर 101 मध्ये शानदार बॅटिंगने विराट कोहनीचे पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिकलं. हॉंगकाँग (IND vs Hongkong Asia Cup 2022) विरुद्ध किंग कोहलीने शानदार अर्थशतकी खेळी केली. या खेळी दरम्यान, 100 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने विराट कोहलीने बॅटिंग केली. रोहित शर्माची विकेट गेल्यानं विराट कोहलीने 44 बॉल्समध्ये 59 धावा केल्यात. विराटच्या स्फोटक फलंदाजीने भारताला 190 च्या पार नेऊन ठेवलंय. तर तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहलीने सूर्यकुमार यादवसोबत (Suryakumar Yavat) शानदार भागीदारी रचली. के एल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या विकेटनंतर आपला क्लास दाखवत दोन्ही खेळाडूंनी चौफेर फटकेबाजी करत हाँगकाँगच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. 44 चेंडूत अवघा एक फोर विराटने लगावला. तर तीन दिमाखदान सिक्स ठोकले. 134.09च्या स्ट्राईक रेटने विराट कोहलीने आपला विंटेज अंदाज हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही विराटने दमदार फलंदाजी केली होती. पण सेट झाल्यानंतर अर्धशतक ठोकण्याची संधी असतानाच त्याने मध्येच आपली विकेट टाकली होती. मात्र आशिया कपच्या दुसऱ्या सामन्यात विराटने नाबाद अर्धशतकी खेळी केली.

9.6च्या रन रेटने भारताने 20 ओव्हरमध्ये 192 धावा केल्या. यात 8 अतिरीक्त धावा हाँगकाँगच्या गोलदांजांनी टाकलेल्या वाईक आणि बाईजमुळे मिळाल्या. तर अन्य सगळ्या धावा या भारतील फलंदाजांनी केल्या. आशिया कपमधील आपला दुसरा सामना खेळताना भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत धावांचा डोंदर उभा केला. विराट कोहलीआधी के एल राहुलने 39 बॉलमध्ये 36 धावा केल्या. तर रोहित शर्माने अवघ्या 13 बॉल्मध्ये 21 धावा कुटल्या होत्या.

निर्विवाद फलंदाजी

दरम्यान, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवने शानदार बॅटिंग केली. अखेरच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवने धावांचा पाऊसच पाडला. तब्बल 4 सिक्स अखेरच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवने ठोकले. सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 बॉल्समध्ये तब्बल 68 धावांची तुफानी खेळी केली. गगनचुंबी षटकारांना ठोकत सूर्यकुमार यादवने हाँगकाँगच्या गोलंदाजांची पूर्ण रणनितीच नेस्तनाबूत केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फारशी नेत्रदिपक कामगिरी करायला न मिळाल्याने निराश झालेल्या सूर्यकुमार यादवने सगळी कसर आशिया कपमधील दुसऱ्या सामन्यात भरुन काढली.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...