IND vs AUS Test: दिल्लीच्या पीचवर विराटची एक कृती, त्यातून दिसली अपयशावर मात करण्याची कोहलीची पॉझिटिव्ह वृत्ती
IND vs AUS Test: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हे विराट कोहलीच होमग्राऊंड आहे. विराटने त्याचा किंग बनण्याचा प्रवास याच स्टेडियममधून सुरु केला होता.

IND vs AUS Test: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीला चाहते प्रेमाने किंग कोहली म्हणतात. उद्यापासून दिल्लीत दुसरा कसोटी सामना सुरु होतोय. या कसोटीत विजय मिळवण्यासाठी विराटला खरोखरच किंग सारखा खेळ दाखवावा लागेल. पहिल्या कसोटीत कॅप्टन रोहित शर्माने शतक ठोकलं. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीकडून चाहत्यांना सेंच्युरीची अपेक्षा आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हे विराट कोहलीच होमग्राऊंड आहे. विराटने त्याचा किंग बनण्याचा प्रवास याच स्टेडियममधून सुरु केला होता. या मैदानावर खेळताना नेहमीच विराट कोहलीचा खेळ बहरला आहे.
1181 दिवसात जे जमलं नाही, ते आता करेल
या मैदानात विराट आतापर्यंत 3 टेस्ट मॅच खेळलाय. 77.83 च्या सरासरीने 467 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत. हे आकडे निश्चितच कोहलीचा कॉन्फिडन्स वाढवत असतील. विराट मागच्या 1181 दिवसात जे करु शकला नाहीय, ते त्याने या सामन्यात करावं, अशी त्याच्याकडून अपेक्षा आहे.
टीम येण्याच्या 40 मिनिट आधी पोहोचला
कोहलीने सुद्धा कंबर कसली आहे. काल प्रॅक्टिस सेशनसाठी कोहली टीम बसमधून नाही, तर स्वत:ची गाडी घेऊन आला होता. टीम येण्याच्या 40 मिनिटं आधी कोहली कोटला स्टेडियमवर पोहोचला. विराटने मैदानात काही वेळ घालवला. त्यानंतर त्याने तयारी सुरु केली.
विराटने खेळपट्टी का खरवडली?
विराटने थ्रो डाऊनवर सराव सुरु केला. आधी त्याने मध्यमगती गोलंदाजीवर प्रॅक्टिस केली. यावेळी त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या खणखणीत फटक्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. त्यानंतर त्याने स्पिन गोलंदाजांना नेटमध्ये बोलवण्याचा इशारा केला. बॅट उचलून तो दुसऱ्या नेटमध्ये गेला. तिथे त्याने स्पिन गोलंदाजीवर सराव सुरु केला. पीचवरील रफ विराटने आपल्या बुटांनी खरवडलं. जेणेकरुन चेंडूला आणखी स्पिन मिळेल.
एकाच प्रकारचे गोलंदाज विराटला आऊट करतायत
इंडिया A कडून खेळणारा स्पिनिंग ऑलराऊंडर सौरभ कुमारने कोहलीला स्पेशल ट्रेनिंग दिली. डावखुरी गोलंदाजी खेळताना विराटची कमकुवत बाजू समोर आलीय. त्यावर विराट मेहनत घेताना दिसला. लेफ्टी स्पिनर्सनी विराटला मागच्या काही दिवसात चांगलच सतावलय. विराट लेफ्टी स्पिनर्सची गोलंदाजी खेळताना बऱ्याचदा आऊट झालाय. विराट सराव करताना बॅटिंग कोच विक्रम राठौर तिथे पोहोचले. त्यांनी अत्यंत बारकाईने कोहलीची बॅटिंग पाहिली. उद्या नवीन कोहली दिसेल
ऑफ स्पिनर पुलकित नारंग आणि ऋतिक शौकीन विरोधात विराट सतत पुढे येऊन मोठे फटके खेळताना दिसला. विराटला किंग बनवण्यात ज्या मैदानाने मदत केली, त्यावर तो मेहनत घेताना दिसला. नेट्समध्ये विराट स्पिन गोलंदाजी खेळताना संघर्ष करताना दिसला. नंतर मात्र त्याला सूर सापडला. हाच सूर दुसऱ्या कसोटीत कायम राहूं दे अशी तमाम क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.