Virat Kohli : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटीत विराट कोहलीकडे महारेकॉर्ड करण्याची संधी
Virat Kohli : पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा अव्वल फलंदाज विराट कोहली आपल्या नावावर एक महारेकॉर्ड करु शकतो. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर्सपैकी एकही फलंदाज असा रेकॉर्ड करु शकलेला नाही.
IND vs AUS, 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या सीरीजमधील पहिला सामना 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये खेळला जाईल. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा अव्वल फलंदाज विराट कोहली आपल्या नावावर एक महारेकॉर्ड करु शकतो. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर्सपैकी एकही फलंदाज असा रेकॉर्ड करु शकलेला नाही. विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 64 धावा केल्या, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावा पूर्ण करणारा तो क्रिकेट विश्वातील पहिला एक्टिव बॅट्समन असेल. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर्सपैकी कुठलाही बॅट्समन हा महारेकॉर्ड आपल्या नावावर करु शकलेला नाही.
विराट कोहली महारेकॉर्ड करणार?
विराट कोहलीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात फक्त 64 धावा करण्याची गरज आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट इतिहासात सचिन तेंडुलकरनंतर इतकं मोठं यश मिळवणारा तो दुसरा फलंदाज ठरेल. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर्सपैकी विराट कोहली असा रेकॉर्ड करणारा पहिला फलंदाज असेल. विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24,396 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक 34357 धावांची नोंद आहे.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे बॅट्समन
1. सचिन तेंडुलकर (भारत) – 34357 रन
2. कुमार संगकारा (श्रीलंका) – 28016 रन
3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 27483 रन
4. महेला जयवर्धने (श्रीलंका) – 25957 रन
5. जॅक कॅलिस (साउथ अफ्रीका) – 25534 रन
6. विराट कोहली (भारत) – 24936 रन
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं
1. सचिन तेंडुलकर (भारत) – 100 शतक
2. विराट कोहली (भारत) – 74 शतक
3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 71 शतक
4. कुमार संगाकारा (श्रीलंका) – 63 शतक
5. जॅक कॅलिस (साऊथ अफ्रीका) – 62 शतक
6. हाशिम अमला (साऊथ आफ्रीका) – 55 शतक
नागपुर टेस्टमध्ये अशी असू शकते भारताची Playing 11 :
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.